पालकमंत्री केसरकर यांनी हुपरी नगरपरिषदेच्या विकासकामाची केली पाहणी

हुपरी (शिवाजी फडतारे) : हुपरी येथे नगरपरिषदेच्या विकासकामांबाबतआढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, मुख्याधिकारी अशोक कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारच्या नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या शहरांतील सर्वच प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व निराकरण करण्यासाठी … Read more

कागल सह परिसरात जोरदार पाऊस

कागल (विक्रांत कोरे) : ऐन पावसाळ्यात गेले कित्येक दिवस झाले पावसाने दडी मारली होती. मात्र आज अचानक आकाशात ढग दाटून आले. सायंकाळपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने कागल सह परिसर ओला चिंब झाला आहे. गेले कित्येक दिवस झाले वरून राजाने दडी मारली होती. त्यामुळे पिके करपू लागली होती. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला . आज सायंकाळ पासून … Read more

लोकअदालत मध्ये 54 प्रकरणे तडजोडीने निकालात

कागल / प्रतिनिधी : कागल येथील न्यायालयात लोक अदालत नुकतेच पार पडले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ,कागल येथील दिवाणी कनिष्ठ न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रिलिटीगेशनची बँकेच्या 1182 प्रकरणांपैकी,54 प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आली. यामध्ये रुपये 31 लाख 57 हजार0 59 इतक्या रकमेची वसुली … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारा अभावी रुग्णांचे हाल

रुग्णांची वाढती गर्दी सुविधा अपुऱ्या याला जबाबदार कोण ? मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता व अनेक गावचे डेंग्यूसदृश्य रुग्ण दाखल होत असताना त्यांना बेड मिळत नाहीत एका कंत्राटी डॉक्टर व नर्सवर रुग्णालय चालत असल्याचा अनुभव आज आला . आरोग्य प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे . रुग्णांच्या … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार वर्धापनदिन विशेषांक ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार वर्धापनदिन विशेषांक गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

कागलमध्ये उड्डाणपुलाच्या उभारणीप्रश्नी केली पाहणी

कागल : राष्ट्रीय महामार्ग कागल विस्तारीकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमलू श्रीवास्तव यांनी कागल येथे रस्ते विस्तारीकरणअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाची व कागल शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करण्याच्या कामाबद्दल पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे उपस्थित होते. महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या अनुषंगाने शंभर वर्षांपूर्वीचा अरुंद असलेला रस्ता नव्याने करताना मोठा करावा व … Read more

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व कर्करोग शस्त्रक्रिया सुविधा सीपीआरमध्ये होणार सुरु

आठवड्याच्या दर बुधवारी बाह्यरुग्ण विभाग इमारतीत देण्यात येणार सेवा; शनिवारी उद्घाटन कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मध्ये कर्करोगावर (कॅन्सर) उपचाराची सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व प्रकारच्या कर्करोगावर (कॅन्सरवर) मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. कर्करोगावरील उपचार सुविधेचा उद्घाटन समारंभ सीपीआर … Read more

किशोर पोतदार यांचा श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेतर्फे संस्थेच्या मुख्यशाखेच्या सभागृहात श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२३ते २०२७या-साला करीता नुकतीच चेअरमनपदी श्री .किशोर पोतदार यांची निवड झाली . त्याबद्दल त्यांचा श्री . … Read more

विश्वजीत बुगडे यांची आय आय टी मद्रास येथे एम.टेक मध्ये निवड

मुरगूड ( शशी दरेकर) – आय आय टी मद्रास (चेन्नई) द्वारे देण्यात येणाऱ्या Web Enabled एम.टेक. या प्रोग्रॅम मधून विश्वजीत बाबासाहेब बुगडे यांची पदव्यूत्तर शिक्षणासाठी निवड झाली. सध्या ते एनएक्सपी सेमीकंडक्टर या कंपनीत एनालॉग डिझाईन इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच काम हे इलेक्ट्रॉनिक्स व व्हीएलएसआए क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स या … Read more

“गुरुजन हे समाजासाठी सदैव आदरणीय”- युवा नेते विरेंद्र मंडलिक

कोल्हापूर :- ” विद्यार्थी घडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व स्तरावरील शिक्षक हे नेहमीच वन्दनीय आहेत. सर्व गुरुजनांचा आदर आणि सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सदैव कटी बद्ध आहोत,” असे प्रतिपादन युवा नेते वीरेंद्र मंडलिक यानी केले. ते स्व. शंकरराव दौलतराव पाटील (कोलोलीकर) सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर च्या वतीने आयोजित रामानंद नगर ( कोल्हापूर) … Read more

error: Content is protected !!