
कोल्हापूर :- ” विद्यार्थी घडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व स्तरावरील शिक्षक हे नेहमीच वन्दनीय आहेत. सर्व गुरुजनांचा आदर आणि सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सदैव कटी बद्ध आहोत,” असे प्रतिपादन युवा नेते वीरेंद्र मंडलिक यानी केले. ते स्व. शंकरराव दौलतराव पाटील (कोलोलीकर) सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर च्या वतीने आयोजित रामानंद नगर ( कोल्हापूर) परिसरातील आदर्श शिक्षकांच्या गुण गौरव समारंभात बोलत होते.
न्यू इंग्लिश स्कूल जरग नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक जीवन साळोखे होते. या प्रसंगी आण्णासाहेब पाटील, प्रा. सौ. अनुराधा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक संयोजक ज्येष्ठ कार्यकर्ते व रंगकर्मी संजय शंकरराव पाटील ( कोलोलीकर) यानी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ॲड. ए. डी. पाटील, रणजित पाटील यानी केला. सत्कारमुर्ती शिक्षक अमित दत्तात्रय पोटकुले व सौ.सीमा अमर मगदूम (जरग विद्या मंदीर), रवी रामचंद्र सराटे, (विठाबाई पाटील विद्यालय), सुरेश रामचंद्र बोडेकर (न्यू इंग्लिश स्कूल), सौ. वर्षा शेवाळे (साई इंग्लिश मीडियम स्कूल) यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. ॲड. वीरेंद्र मंडलिक यानी स्व. शंकरराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवन साळोखे यानी वाचनाचे महत्व सविस्तर विशद करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास बदलत्या काळात शिक्षकांनी नित्य नवीन वाचत रहावे असे सांगून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले.
आभार मुख्याध्यापक गणेश चव्हाण यानी मानले. याप्रसंगी उद्योगपती विनय नलवडे, प्रा. संजय गायकवाड, संदीप जाधव, सचिन चौधरी, रवी पाटील, शिवाजी जाधव, संदीप ढेरे ,केशव स्वामी, रामभाऊ खाडे, अंतु परिट, संजय मोरे, विजय माने, प्रदीप कदम, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.