बातमी

पालकमंत्री केसरकर यांनी हुपरी नगरपरिषदेच्या विकासकामाची केली पाहणी

हुपरी (शिवाजी फडतारे) : हुपरी येथे नगरपरिषदेच्या विकासकामांबाबतआढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, मुख्याधिकारी अशोक कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारच्या नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

या शहरांतील सर्वच प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारा निधी अल्पावधीत निश्चितपणे उपलब्ध करून देण्यात येईल.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, अजित सुतार, दौलतराव पाटील, दिनकर ससे, नितीन गायकवाड, आदी उपस्थित होते. रामचंद्र मधाळे यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *