हातकणंगले व गडहिंग्लज या दुष्काळग्रस्त तालुक्यात शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती तात्काळ अंमलात – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

collector

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करुन त्या संबंधी सवलती लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हातकणंगले व गडहिंग्लज या तालुक्यामध्ये शासनाने मंजुरी दिलेल्या सवलती लागू करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ११ ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक ११ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

शिरोडा समुद्रात बुडून कागलच्या एकाचा मृत्यू

कागल : शिरोडा (जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रात बुडून कागल येथील अवधूत हरिभाऊ जोशी (वय ३९) यांचा मृत्यू झाला. दिनांक 26 च्या दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. अवधूत जोशी हे त्यांच्या मित्रांसोबत वेळागर-शिरोडा येथे पर्यटनासाठी गेले होते. समुद्रकिनारी पोहण्यासाठी सर्वजण पाण्यात गेले होते. यावेळी अवधूत यांना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. यावेळी मित्रांनी … Read more

शिवराजच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील शिवराय विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड मधील राष्ट्रीय हरित सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळशी विवाह निमित्त तुळशी पूजनासाठी विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज चे उपमुख्याध्यापक आर. बी. शिंदे होते. तुळस ही बहुगुणी वनस्पती असून आयुर्वेदामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या पुराणग्रंथांमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे एक … Read more

प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल -सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना पुणे येथे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य डॉ. एस. एन. पठाण यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड २०२३ गौरवपूर्ण समारंभात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह … Read more

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):  ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  किंवा https://forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र. सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस … Read more

हेड कॉन्सटेबल (जनरल डयुटी) च्या पदभरती

कोल्हापूर, दि. २४ (जिमाका): सहायक महानिरीक्षक, भर्ती, महानिदेशालय, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (गृहमंत्रालय) नवी दिल्ली येथे हेड कॉन्सटेबल (जनरल डयुटी) चे पद सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्यूरिटी फोर्स (CISF) च्या स्पोर्टस कोटयामधील २०२३ यांच्याकडील २१५ पदे भरायची असून, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८ नाव्हेंबर २०२३ असून परिक्षेकरीता https://cisfrectt.cisf.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. योजनेंचा/जाहिरातीचा अधिकाधिक … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक 10 गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली : पालकमंत्री हसन मुश्रीफ

बिद्रीच्या निवडणूकीतील सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचा वाघापुरातून प्रचार शुभारंभ मडिलगे (जोतिराम पोवार) : मागील सात वर्षे राज्यात उच्चांकी उस दर देणाऱ्या आणि विविध प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बिद्री साखर कारखान्याची बदनामी करणाऱ्या विरोधी मंडळींना मते मागण्याचा अधिकार नाही. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या आणि कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकविण्याची वेळ आली … Read more

सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयाचे प्रा. डॉ . शिवाजी होडगे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मॉरिशसला रवाना

मुरगूड ( शशी दरेकर ) – मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व अभ्यास दौऱ्यासाठी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे नुकतेच रवाना झाले आहेत. भारत मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध, कला साहित्य आणि संस्कृती यास अनुसरून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मॉरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 आणि 24 … Read more

error: Content is protected !!