बातमी

रविवारी कागल येथे मातंग समाज मेळाव्याचे आयोजन

नामदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ

कागल : कागल तालुका मातंग समाजाच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्य नामदार हसनसो मुश्रीफ यांचा सत्कार मानपत्र समारंभ व मातंग समाजातील गुणवंत व मान्यवरांचा सत्कार व मातंग समाज मेळावा रविवार दिनांक ०३/०९/२०२३ रोजी सांयकाळी ४.०० वाजता छत्रपती शाहू हॉल चौक चौक कागल येथे आयोजित करणेत आलेला असून सदर समारंभाचे अध्यक्ष नामदार हसनसो मुश्रीफ वैदयकीय व विशेष सहाय मंत्री आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार संजयदादा मंडलिक आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे माजी आमदार संजयबाबा घाटगे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास प्रमुख वक्ते मा. प्रा. सुकुमारजी कांबळे ( संस्थापक डी पी आय ) मार्गदर्शन करणार आहेत.सदरच्या मेळाव्या प्रसंगी कागल शहरात म. जोतिराव फुले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणी योगदान बददल हसनसो मुश्रीफ यांना सत्कार मानपत्र देवून करण्यात येणर आहे तसेच समाजातील तालुक्यात ग्रामपंचायती व इतर विविध संस्थेत निवड झालेल्या पदाधिकारी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजित करणेत आलेला आहे.

या कार्यक्रमास जिल्हातील व तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास मातंग समाज बांधवानी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दलित मित्र बळवंतराव माने यांनी केले आहे सदर पत्रकार परिषदेस प्रकाश तिराळे, संजय हेगडे, मोहन आवळे, संजय कांबळे, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *