जागतिक लसीकरण कार्यक्रम हा भारत सरकारने १९८५ मध्ये सुरु केलेला लसीकरण कार्यक्रम आहे. १९९२ मध्ये हा बाल जीवित्व आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाचा एक भाग बनला आणि २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) हा एक महत्त्वाचा भाग आहे. यालाच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम किंवा नियमित लसीकरण कार्यक्रम असेही म्हणतात. 10 नोव्हेंबरला जागतिक लसीकरण दिन साजरा केला जातो.
प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतुशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.
समाविष्ट असलेल्या लसी- क्षयरोग, डिप्थीरिया, धनुर्वात, पोलिओ, गोवर, हिपॅटायटीस बी, अतिसार, जपानी एन्सेफलायटीस, रुबेला, न्यूमोनिया (हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी) आणि न्यूमोकोकल रोग (न्यूमोकोकल आणि न्युमोनिया आणि मेंदूज्वराचे लसीकरण) समाविष्ट आहे. हिपॅटायटीस बी आणि न्यूमोकोकल रोग अनुक्रमे २००७ आणि २०१७ मध्ये जोडले गेले.
यूआयपीमध्ये समावेश झालेल्या इतर रोगांच्या लसी म्हणजे निष्क्रिय पोलिओ लस (आयपीव्ही), रोटाव्हायरस लस (आरव्हीव्ही), गोवर-रुबेला लस (एमआर). देशातील वैश्विक लसीकरण कार्यक्रमात (यूआयपी) चार नवीन लसी आणल्या गेल्या आहेत, ज्यात इंजेक्टेबल पोलिओ लस, जपानी एन्सेफलायटीस आणि न्यूमोकोकल कन्जुगेट लस यासाठी प्रौढांच्या लसींचादेखील समावेश आहे.
रोटा विषाणू, रुबेला आणि पोलिओ (इंजेक्टेबल) या लसी देशाला सहस्रक विकास उद्दिष्टातील ४ उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतील. तसेच जागतिक स्तरावर पोलिओ निर्मुलनाचे लक्ष्य गाठणे समाविष्ट आहे. जपानी एन्सेफलायटीस विरुद्ध प्रौढांची लसदेखील हा रोग मोठ्या प्रमाणावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लागू केली जाईल. देशातील
लसीकरणविषयक सर्वोच्च वैज्ञानिक सल्लागार संस्था, नॅशनल टेक्निकल डव्हायझरी ग्रुप ऑफ इंडियाने (एनटीएटीआय) असंख्य वैज्ञानिक अभ्यास आणि सर्वसमावेशक विचारविनिमयानंतर या नवीन लसी लागू करण्याच्या शिफारसी केल्या आहेत.
या नवीन लसींच्या सहाय्याने आता भारताचा वैश्विक लसीकरण कार्यक्रम (युआयपी) दरवर्षी २.७ कोटी दशलक्ष बालकांना ३ रोगांविरुद्ध विनामूल्य लसीकरण करण्यात येते. पेंटाव्हॅलेंट लस समाविष्ट करण्याच्या निर्णयामुळे सुमारे एक लाख शिशु आणि प्रौढ लोकांचा मृत्यू रोखण्यास मदत होईल आणि या रोगांमुळे दरवर्षी सुमारे १० लाख व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यापासून टाळले जाईल.
चार नवीन जीवनरक्षक लसींचा समावेश, देशातील बालमृत्यू आणि विकृती कमी करण्यात महत्त्वाची भुमिका बजावेल. यापैकी अनेक लसी आधीच खाजगी प्रॅक्टिशनर्सच्या माध्यमातून ज्यांना परवडतील त्यांना उपलब्ध आहेत. सामाजिक आणि आर्थिक स्थिती विचारात न घेता लसीकरणाचे फायदे समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचतील हे आता सरकार सुनिश्चित करेल.
फेब्रुवारी २०१७ पासून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यूआयपीमध्ये गोवर– रुबेला लस आणली. जगातील सर्व लोकांसाठी लसीचे महत्त्व माहित आहे. विशेषत: कोविड-19 साथीच्या रोगादरम्यान प्रत्येकाला लसचे महत्त्व कळले आहे. प्राणघातक आणि धोकादायक आजार रोखण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आज, जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेमुळे गोवर, टिटॅनस यासारख्या अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार दरवर्षी लसीकरणाद्वारे 2-3 दशलक्ष बालकांचे जीव वाचतात. गेल्या दोन दशकांमध्ये, धोकादायक आजारांशी लढण्यासाठी लस एक अविभाज्य साधन बनलं आहे. यामुळे, लक्षावधी लोकांना टिटॅनस, पोलिओ आणि टीबी यासारख्या अत्यंत गंभीर आजारापासून वाचविण्यात यश आलं आहे.
प्राणघातक आणि धोकादायक आजार रोखण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण – चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात.
पार्श्वभूमी- बालकांमधील लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा-या आजारांचे प्रमाण व त्या आजारांमुळे होणारे मृत्यु कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर १९७७ मध्ये लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा-या घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ व क्षयरोग या पाच आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी “विस्तारित लस टोचणी कार्यक्रम (विलटो)” सुरु करण्यात आला. सन १९८५-८६ मध्ये “सार्वत्रिक लसीकरण” कार्यक्रम सुरु करण्यात आला. गोवर लसीचा समावेश सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये करण्यात आला. नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये हिपॅटायटिस बी या रोगाच्या लसीचा समावेश राज्यात सन २००८-०९ मध्ये टप्याटप्याने करण्यात आला. आता ही लस सर्व जिल्हयांमध्ये लागू करण्यात आली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात जापनीज एन्सेफलायटिस या रोगाच्या लसीचा समावेश अमरावती (महानगरपालिकासहीत) यवतमाळ, नागपूर, भंडारा, वाशिम, गडचिरोली, लातूर आणि बीड जिल्हयात करण्यात आला. महाराष्ट्रात लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये सन २०११ पासून गोवर लसीच्या दुस-या मात्रेचा समावेश करण्यात आला.
विशेष वैशिष्ठ्ये- लसीकरणाव्दारे प्रतिबंध करता येणा-या आजारांसाठी लहान बालकांचे लसीकरण, धनुर्वातासाठी गरोदर मातांचे लसीकरण. नियोजित सत्रांमध्ये लसीकरण करणे, लसीची क्षमता टिकविण्यासाठी शितसाखळीचे व्यवस्थापन लसीकरणाची सुरक्षितता वाढविण्यासाठी सर्व जिल्हे व महानगरपालिका यांना एडी सिरिंजेसचा पुरवठा करण्यात येतो, जैविक वैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे नियमित प्रशिक्षण लसीकरणानंतर उदभवणा-या विपरित प्रतिक्रियांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर अन्वेषण समित्यांची स्थापना
कार्यक्रमाची कार्यपध्दती – राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येतो. लसी तसेच सिरिंजेस शितसाखळी उपकरणे व अनुदान केंद्रशासनाकडून पुरविण्यात येते. लसीकरणासाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे दिलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा वापर केला जातो. आरोग्य संस्था व बाहय संपर्काच्या ठिकाणी ठराविक दिवशी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते. लाभार्थीपर्यंत लस पोहचविण्यासाठी लसीची वाहतूक करताना शितसाखळीची गुणवत्ता अबाधित ठेवली जाते. आरोग्य व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणा-या लाभार्थीची नोंद लसीकरण रजिस्टर मध्ये करतात. लसीकरणाच्या सेवा प्रशिक्षित कर्मचा-यांकडून लाभार्थीना विनामुल्य पुरविल्या जातात. लसींची शितसाखळी अबाधित ठेवण्यासाठी आईसलाईन्डम रेफ्रीजरेटर, डिपफ्रीजर, कोल्ड बॉक्स व्हॅक्सीन कॅरिअर, आईस पॅक, वॉक इन कुलर आणि फ्रीजर्स अशा उपकरणांचा वापर केला जातो. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम स्वरुपात संपुर्ण राज्यात व ठराविक जिल्हयांच्या जिल्हयांत अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते.
सेवा देणाऱ्या संस्था – जिल्ह्यामध्ये लसीकरणाच्यी सेवा पुढील संस्थांमध्ये उपलब्ध असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा / स्त्री रुग्णालये, नगरपालिका दवाखाने, कॅन्टोनमेंट रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, वैदयकिय महाविद्यालय रुग्णालये, इतर शासकीय व निमशासकीय रुग्णालये, खाजगी मानांकित रुग्णायलये / दवाखाने धर्मादाय व स्वयंसेवी रुग्णागलये / दवाखाने व संस्थेच्या कार्यक्षेत्रात हाणारा बाहयसंपर्क आरोग्य सेवा सत्रे
I am sure this article has touched all the internet visitors, its really really pleasant post on building
up new webpage.