बातमी

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका ) : सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam.gov.in/ किंवा https:// forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर भेट देवून आपलं नाव नोंदणी करून घ्यावी. अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२३ असून जिल्ह्यातील किमान ३००-५०० उमेदवारांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका  कोल्हापूर  येथे प्रत्यक्ष अथवा ०२३१-२५४५६७७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे  आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. 

स्पर्धेकरिता पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत – जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.  Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Digital Construction, Industrial Design Technology, Industry 4.0, Information Network Gabling, Mechatronics, Robot System  Integration & Water Technology  या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

सन २०२४ मधील ल्योन , फ्रांस येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs), तंत्रनिकेतन महाविद्यालये (Polytechnics), अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges), MSME Tool Rooms, CIPET, IIT, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellary making प्रशिक्षण संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

2 Replies to “जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *