05/10/2022
0 0
Read Time:3 Minute, 4 Second

२० सदस्यापैकी १० माहिला सदस्य व अनुसूचित जातीसाठी ३ जागा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड नगरपरिषदेच्या २०२२ सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग आरक्षण आज सोडत पध्दतीने काढण्यात आले. एकूण दहा प्रभागातून निवडून द्यावयाच्या २० जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले . ही आरक्षण सोडत प्रभाग आरक्षण नियंत्रण अधिकारी म्हणून भुदरगड -आजराच्या प्रांताधिकारी सौ . वसुंधरा बारवे व प्रभारी मुख्याधिकारी आजिंक्य पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आजी माजी नगरसेवक व नागरिकांसमोर प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली .सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला आरक्षण चिठ्ठीने करण्यात आले . यात प्रभाग क्रंमाक ९ व १०मध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित महिलेकरिता आरक्षित करण्यात आली. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर आधारित प्रभाग क्र .४ ‘ ९ व १० अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रमाण मानून आरक्षित करण्यात आले. त्यातील प्रभाग क्र. ४ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला.

इतर १७ जागाकरिता आरक्षण ठरविण्यात आले त्यामध्ये ८ सर्वसाधारण महिलेसाठी व ९ जागा सर्वसाधारण ( खुला वर्ग ) म्हणून आरक्षित करण्यात आले . ते प्रभागनिहाय असे : सर्वसाधारण महिला प्रभाग क्र .१ ‘ २ ‘ ३ , ४ , ५ , ६ , ७ व ८ अशा एकूण आठ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित प्रभागा क्र .१ ‘ २ ‘ ३ , ५ , ६ ‘ ७ ‘ ८ ‘ ९. व १० अशा एकूण नऊ जागा आहेत. प्रभाग क्र ७ व८ खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. प्रभाग रचना यापूर्वीच निश्चित झाली असून आता आरक्षण निश्चिती झाली आहे.

३० जूनपर्यंत प्रभागवार मतदार याद्या निश्चित होणार आहेत. त्यानंतरच निवडणूक रणधुमाळी सुरू होईल. आरक्षण सोडतीवेळी पालिका अभियंता प्रकाश पोतदार , प्रशासन अधिकारी स्नेहल पाटील, अमोल गवारे, रणजीत निंबाळकर, अमर कांबळे , ज्योती पाटील, अनिकेत सुर्यवंशी, जयवंत गोधडे, मारुती शेटे, सुनिल पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!