मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्रात गोवा राज्यातील दारू विक्री बंदी असताना तमणाकवाडा ता.कागल येथे गोवा राज्यातील दारू नेत असताना मुरगूड पोलिसांनी या दारू घेऊन जाणाऱ्या वाहनावर छापा टाकून गोवा बनावटीची इनोव्हा गाडीसह सुमारे ७ लाख ५५ हजार रू.किमतीची दारू जप्त केल्याची घटना दि.१५ रोजी घडली असल्याची माहिती मुरगूड पोलीसानीं दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की दि.१५ रोजी २.४५ च्या दरम्यान बोणकाट खडी पाणंद रस्ता तमनाकवाडा येथून गोवा बनावट दारू नेण्यात येत होती. याची माहिती राहुल बाळासो देसाई यांनी मुरगूड पोलीस स्टेशनला देताच पोलिसांनी छापा टाकला व अंदाजे ७ लाखाची गोवा -बनावट दारू जप्त करून गुन्हा नोंद केला असला तरी या दारूची वाहतूक करणारे तीन इसम फरार झाले आहेत. तर पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत.