बातमी

श्री. लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचे रविवारी शेळेवाडी येथे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली२ कोटी५२ लाख७१ हजारावर ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा व१०० कोटींचा ठेवीचा टप्पा पार करणारी श्री लक्ष्मीनारायण नागरी-सहकारी पतसंस्थेच्या ६ व्या शाखेचा उद्घद्याटन सोहळा शेळेवाडी ता . राधानगरी येथे रविवार दि .२८ / ०४ / २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होणार आहे.

मुरगूड येथील मुख्य शाखेसह कूर ( ता. भुदरगड ) , सरवडे ( ता. राधानगरी ) , सावर्डे बु॥ ( ता. कागल ) , व सेनापती कापशी ( ता. कागल ) , या शाखा कार्यरत आहेत .
आता शेळेवाडी येथे नवीन शाखा सुरु होऊन कार्यरत राहणार आहे.

या नवीन शाखेचे उदघाटन संस्थापक संचालक मा . श्री . जवाहर शहा यांच्या शुभहस्ते होणार असून संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संस्थेचे विद्यमान चेअरमन मा . श्री . किशोर पोतदार यांच्या हस्ते होणार आहे .या शाखेच्या उदघाटन सोहळ्यास सभासद , ठेवीदार, हितचिंतकानीं उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळासह -कार्यकारी संचालक नवनाथ डवरी यानी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *