बातमी

आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिकेसंदर्भात बैठक

इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशोकराव जांभळे व मदन कारंडे हे दोन्ही गट एकत्र येणार असून आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकावण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना माननीय आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की, श्री गणरायाच्या आगमनाने हे दोन्ही गट एकत्र येत आहेत याचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला श्री गणेशाचे आशीर्वाद मिळाले आहेत.

सत्ता गोरगरिबांच्या कल्याणासाठी… यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे केले आवाहन

आजपासून दोन्ही गट एकत्र काम करून गोरगरीब जनतेचे कल्याण करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा नक्कीच फडकावतील, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीस लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी इचलकरंजीतील प्रमुख कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *