गडहिंग्लज – धनंजय शेटके
गेल्या दहा महिन्या पासून दिल्ली येथील सीमेवर शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.त्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना,१९ समविचारी पक्षांनी भारत बंद पुकारला होता.या साठी गडहिंग्लज मध्ये आज जनता दल,काँग्रेस,यांच्या सह शेतकरी संघटना विविध कर्मचारी संघटना यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.या वेळी बोलताना नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या दिल्लीच्या सीमेवर गेली दहा महिने शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.या आंदोलनात ६०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला आहे.देशातील लोकशाही घालवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.केंद्र सरकारने जे तीन काळे कृषी कायदे आणले आहेत ते ताबडतोब रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी केली.काँग्रेसचे प्रशांत देसाई म्हणाले की या तीन काळया कृषी कायद्यांच्या विरोधात आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत कष्टकरी महिला,शेतकरी गेल्या दहा महिन्या पासून दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.६०० शेतकरी या आंदोलनात आपण गमावले आहेत.तसेच देशात महागाईचा भडका उडाला आहे.पेट्रोल डिझेल ने शंबरी पार केली आहे गॅस हजार रुपयांपर्यंत पोहचला आहे.त्या मुळे हे मोदी सरकार आपण उलथवून टाकायला हवे.या बंद साठी शहरातील अत्यावश्यक सेवा व प्रवासी वाहतूक वगळता सर्व दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.