मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी जपली सामाजिक बांधिलकी

अपघातग्रस्त बेशुद्ध पेशंटला नेले स्वतःच्या गाडीतून

मुरगुड(शशी दरेकर): मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी  जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या अपघातग्रस्त पेशंटला स्वतःच्या गाडीतून नेऊन नंतर ऍम्ब्युलन्समध्ये दाखल केले. शनिवार दि. १८ दुपारी साडेतीनची वेळ. कोल्हापूरवरून मोटारसायकलवरून मुलगीला घेऊन येणारे गोरंबेचे श्री. मच्छिंद्र सदाशिव सुतार, वय ४७ हे गोरंबेच्या घाटात अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे मोटरसायकलवरून पडले. डोक्याला जोरदार मार लागलेले श्री. सुतार रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन पडले होते. त्यांच्या दोन्ही कानातून रक्त वाहत होते. त्याचवेळी कागलवरून गोरंबेकडे येणाऱ्या गोरंबेच्या माजी सरपंच दत्ता रावण पाटील यांनी तातडीने १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!