बातमी

कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबना प्रकाराचा मुरगुडमध्ये-तीव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ):

कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री मूर्तीवर विटंबना करण्यात आल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मुरगूड शहरातील शिवप्रेमींनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. शनिवारी सकाळी ११ वाजता मुरगूड मधील सर्व शिवप्रेमी बस स्थानक येथे जमा झाले त्यानंतर शिवभक्त धोंडीराम परीट यांनी प्रारंभी मनोगत व्यक्त केले .बेळगांव येथे शिवप्रेमी आंदोलकानांअटक केल्याचा निषेधही अनेक शिवप्रेमीनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

त्यानंतर ओंकार पोतदार, माजी नगरसेवक किरण गवाणकर, माजी नगरसेवक शिवाजी चौगुले, संजय घोडके यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर या घटना वारंवार घडत असूनही कर्नाटक सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्याच्या ध्वज पेटवून कर्नाटक राज्य सरकारचा निषेध करण्यात आला .

यावेळी नगरसेवक भगवान लोकरे नगरसेवक दत्ता मंडलिक नगरसेवक संदीप कलकुटकी,नगरसेवक दीपक, शिंदे,बबन बरदेस्कर, अमर चौगुले, पांडुरंग पाटील,अभी मिटके, भाऊ सुतार अतुल आमते धिरज गोधडे समाधान पोवार, भाऊ सुतार, दिग्विजय चव्हान, मयूर सुतार, ओंकार मोरबाळे, बाजीराव खराडे, पांडूरंग संकपाळ, विजय मेटके, अक्षय भोसले, बबन बाबर यांच्यासह शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *