बातमी

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गडहिंग्लज येथे केली जोरदार निदर्शने

गडहिंग्लज(धनंजय शेटके) : उत्तर प्रदेश मधील लखिमपुर येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या वर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील वाहनाने बेदरकार पने चिरडल्याने सहा शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत त्या मुळे संपूर्ण देशभरात जनक्षोभ उसळला आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज राज्य बंद ची हाक दिली होती. गडहिंग्लज मध्ये सकाळी दहा वाजल्यापासून महविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले.

या बंद सर्व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.तसेच एस. टी वाहतूक बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांची भेट घेऊन या बंद ला सहकार्य करण्याचे आवाहन केले. या वेळी गडहिंग्लज शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने तसेच शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच माननीय पंतप्रधान यांच्या नावाचे असलेले निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना स्वीकारण्यास विनंती केली असता त्यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्या मुळे हे निवेदन कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयाच्या दारावर चिकटविले. या बंद ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *