बातमी

सिद्धनेर्ली येथे नदी पुलावर ट्रक पलटी

सिद्धनेर्ली(लक्ष्मण पाटील): सिद्धनेर्ली ता. कागल येथे निढोरी राज्यमार्गावर बामणी व सिद्धनेर्ली या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलावर धान्याने भरलेली ट्रक पलटी झाला. या ट्रकने दुधगंगा नदीच्या पूलावरील सुमारे शंभर फूट इतका लोखंडी संरक्षक कठडा तोडला आहे.रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर काही वेळ या मार्गावरून वाहतूक बंद होती.

मात्र काही नागरिकांनी हा ट्रक एका बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या ट्रक मधील धान्य दुसऱ्या टेम्पोतून भरलेला ट्रक बाजूला करून या मार्गावरून वाहतूक सुरू केली. आरजे 14 जीके 27 94 असा ट्रकचा क्रमांक आहे. गोव्याकडे हा ट्रक चालला होता.

आरिफ खान असे ड्रायव्हरचे नाव असल्याचे समजते.या अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *