मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल -येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक चंद्रकांत माळवदे यांच्या ‘गोव-या आणि फुले’ या आत्मचरीत्रास गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’ द्वारा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. दरवर्षी विविध प्रकारच्या दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी या मंच तर्फे दिल्या जाणा-या ‘राज्यस्तर पुरस्कार योजनेंतर्गत’, सन २०२३-२०२४ या वर्षी प्रकाशित पुरस्कारांची नुकतीच घोषणा मंचचे अध्यक्ष डाॅ. मा. ग. गुरव यांनी केली.
मंचतर्फे घोषित राज्यभरातील सर्व विजेत्यांना, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि शिवाजी विद्यापीठ अधिक्षक डाॅ.किरण गुरव यांच्या हस्ते व माजी आमदार बजरंग देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी(२४ फेब्रुवारी) ला गारगोटीच्या शाहू वाचनालयात होणार आहे. माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरीत्रास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे समजताच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.