बातमी

इंजिनिअर मयूर आंगज यांनी आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने केला वाढदिवस साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड – कुरणी दरम्यानच्या वेदगंगा नदीवरील पूलावर दोन्ही बाजूस व पूलावर मोठ- मोठे खड्डे पडले होते. हे वाहतूकीसाठी धोकादायक असलेने हे खड्डे तातडीने पाठबंधारे उपविभाग निढोरी यानां हे खड्डे मुजवण्यासाठी वारंवार मागणी व पुलावरील खड्यात वृक्षारोपन यासारखे आंदोलन करूनही त्याकडे हेतू पुरस्करपणे दुर्लक्ष केले होते.

मुरगूड -कुरणी दरम्यान वेदगंगा नदीवर हा १९६७ साली पूल बांधण्यात आला आहे .पाच -सहा वर्षापूर्वी या पूलाची डागडूजी झाली होती. या पूलामुळे नदीपलीकडील सुमारे १५ गावांना मुरगूड बाजारपेठेत येणे सोईचे ठरते. त्याचबरोबर विद्यार्थांची संख्याही लक्षणीय आहे. या पूलावर अनेक ठिकाणी व दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले होते. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता होती.

या सर्वबाबींचा विचार करून मुरगूडमधील प्रसिद्ध इंजिनिअर व काँन्ट्रेक्टर मयूर आंगज यानी आपल्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून २३ ऑगष्ट रोजी होणाऱ्या आपल्या वाढदिवसानिमित्य स्वखर्चाने मुरगूड – कुरणी बंधाऱ्यावरील रस्त्याची सिमेंट क्राँक्रीटीकरण व व्यवस्थितपणे डागडूजी करुन रस्ता सुव्यवस्थित करून सामाजिक बांधिलकी जपली. या त्यांच्या सामाजिक आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

या वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमास वडील श्री. संभाजी आंगज सर, राहुल आंगज, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा, शशी दरेकर, किशोर पोतदार, निवास कदम, पी.डी. माने सर , कोल्हापूर जिल्हा बेकर्सचे संचालक महादेव साळोखे, दिग्वीजय पाटील (भडगांव), मारुती बुवा (चिमगांव), बाळासो कांबळे, सिकंदर जमादार, प्रदिप वर्णे, समीर हळदकर, राजू मिठारी, शिवाजी गोरुले, सचिन हंचनाळे ( भडगांव ), पी .डी. चौगले, आण्णासो थोरवत, संजू किल्लेदार, विष्णू मोरबाळे, सातापा हळदकर, बसवंत साळुंखे, सुरेश परीट, भाऊ परीट, राहुल सुतार, औकार खराडे, कृष्णात मसवेकर, प्रविण मिसाळ, सर्पमित्र रघुनाथ बोडके यांच्यासह मित्रपरिवार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *