
मुरगूड (शशी दरेकर) : बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे सर्व 25 उमेदवार विजयी झाले. या नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 15 डिसेंबरला होत आहे. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित असून उपाध्यक्ष पदासाठी मुरगुड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील हे गेले 40 वर्षे निवडून येतात. परंतु तालुक्याला गेले कित्येक वर्षे या पदापासून वंचीत ठेवण्यात आले. त्यामुळे प्रविणसिंह पाटील तसेच ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे व सुनिलराज सुर्यवंशी यांच्या ही नांवाची चर्चा होऊ शकते.
मुरगूडचे माजी नगरसेवक संपत कोळी व प्राथमिक शिक्षक बॅंकेचे कॅशिअर राजेंद्र चव्हाण यांनी कागल तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रविणसिंह पाटील यांना अध्यक्षपद मिळावे त्यांचे वडील कै विश्वनाथराव पाटील हे 15 वर्षे अध्यक्ष होते कारखान्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या मुळे त्यांना सन्मानपूर्वकच अध्यक्ष पद मिळावे अशी मागणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच माजी आमदार संजयबाबा घाटगे या नेते मंडळीचा अंतिम निर्णय असेल.