बातमी

दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालयाची दिव्या गुरव कागल तालुक्यात द्वितीय, मुरगुड केंद्रात प्रथम

दहावीचा निकाल 98.62 टक्के विक्रमी निकालाने समाधान

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील दिव्या गुरव हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तर सृष्टी पाटील 98.20 व प्रतीक खराडे 98 टक्के गुण मिळवून केंद्रात द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगुड चा दहावीचा यावर्षीचा निकाल 98.62 टक्के इतका विक्रमी लागला असून 90 टक्के च्या वरती 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 80 टक्के च्या वरती 48 तर 75 टक्के च्या वरती 16 व 60 टक्के च्या वरती साठ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ‌

दीपिका लुगडे( 96.40) संचित चौगले (96) मृणाल कापसे (95.80) यश भोई (95.60) अंकिता शेटके (95) धनश्री टेंबुगडे ( 95 ) सुमित आरेकर( 95) अमृता तांबेकर( 94.60) रसिका कांबळे (94) उत्कर्षा मुसाई (93.60) सृष्टी लाड (93.20) सई मोरबाळे (92 80) रोहित इंदलकर (92.80) रणवीर मडीलगेकर (92 ) पायल टेंबुगडे, 91.60 आरती बेलवलेकर (91. 40) भक्ती भांदीगरे ( 91.40) मीनाक्षी पठाडे (91.20) तेजस कटके( 90.60) ज्ञानेश्वरी कोळेकर( 90.60) प्रज्वली काळुगडे (90.20) राजनंदिनी शिऊडकर (90.20) श्रद्धा फराकटे ( 90.20) मधुरा तावडे (90.20) तनिष्का चव्हाण (90.20) अंकिता पाटील( 90.20)

यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,युवा नेते , पेट्न कौन्सिल मेंबर , दौलतराव देसाई, कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस.बी.सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस.एच.निर्मळे यांचे प्रोत्साहन व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेजचा 10वी चा यावर्षीचा निकाल चांगला लागल्याने पालक, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *