स्व. सचिन सणगर स्मृती चषकचे आयोजन

कागल : कागलचे आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू स्व.सचिन सणगर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कागल शहर मर्यादित स्व.सचिन सणगर क्रिकेट स्मृती चषकचे आयोजन ३ डिसेंबर पासून श्री छ. शाहू स्टेडीयम कागल येथे करण्यात येणार आहे. सदर सामने हे १० षटकांचे असतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब वर करण्यात येणार आहे असून प्रवेश फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर … Read more

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) यांचे वतीने उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांना जाहीर निवेदन

बाचणी(तानाजी सोनाळकर) : कागल तालुक्यातील मागासवर्गी्यांना दिले जाणारे जातींचे दाखले रीतसर अर्ज करून देखील सर्वच जातीच्या लोकांना वारंवार तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय यांचेकडे हेलपाटे मारून देखील वेळेत जातींचे दाखले दिले जातं नाहीत, कुटुंबतील एकाची जातपडताळणी दाखला असताना देखील शासननिर्णय असतानादेखील जातीच्या दाखल्यावर वारंवार भरमसाठ शेरे मारले जातं आहेत यामुळे कागलं तालुक्यातील असंख्य जातींचे दाखले … Read more

कागल तालुक्यातील ९० % मते सतेज पाटील यांच्या पाठीशी….

सतेज पाटील यांचा विजय ही काळया दगडावरची रेघ…… कागल, दि. १८ : कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते गृहराज्यमंत्री श्री  पाटील यांना मिळणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे … Read more

अन्नपूर्णा कडून ऑक्टोबर अखेर ऊसबिले जमा – संजयबाबा घाटगे यांची माहिती ; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश ; साडेपाच कोटी अदा

साके (सागर लोहार): केनवडे (ता.कागल)येथील केमिकल विरहीत (गुळपावडर निर्मीती) करणा॒ऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जँगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे आँक्टोबर अखेर ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ऊसबिलांसह ऊस तोडणी, वाहतूकदार यांचीही बिले त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहेत.अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांनी दिली. यापुढेही शेतकऱ्यांसह वाहतूकदारांची बिले वेळेत जमा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. … Read more

कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न

कागल (शैलेश कांबळे) : भारतातील शिक्षित तरुण वर्ग हा शेती आणि दूध व्यवसायाकडे वाटचाल करत आहे याचं कारण म्हणजे वाढती बेरोजगारी याचा विचार करून तरुण वर्गा हा मार्ग निवडत आहे याचेच अवचित्य साधून कागल तालुक्यातील, श्रेयस अ‍ॅग्रोवेट चे मालक व अमूल पशु आहाराचे जिल्हा वितरक सर्जेराव तोडकर यांनी कागल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे … Read more

बाळासाहेब ठाकरे यांना अन्नपूर्णा शुगर केनवडे येथे आदरांजली

व्हनाळी (सागर लोहार) : शिवसेनाप्रमुख, हिंदू ऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त केनवडे ता कागल येथे अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी कारखान्यातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजनअन्नपूर्णा शुगरचे चेअरमन संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते, संचालक के. पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संजयबाबा घाटगे म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत … Read more

लढवय्या कार्यकर्ता हरपला

मदतीसाठी केव्हाही हाक द्या बंदा हाजीर. तसेच मनमिळाऊ, हसमुख, लढवय्या अशी सर्वसामान्यांत आपली ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे लिंगनूर गावचे प्रतिष्ठीत संदीप बावचे हे होत. धार्मिक पर्यटनासाठी गणपतीपुळे या ठिकाणी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि लिंगनूरवासीयांच्या काळजाला चटका बसला. संदीप यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाल्याने कागल तालुक्यातील संबंध पंचक्रोशीत हळहळ व्यक्त … Read more

11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक आदालतीचे आयोजन –
सहभागी होण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन

उजळाईवाडी(नंदकिशोर धुमाळ) : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांचे वतीने 11 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी मा.श्रीमती व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील औदयोगिक न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि शाळा न्यायाधिकरण येथे आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आले … Read more

करनूर तंटामुक्त अध्यक्षपदी महंमद शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची निवड

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी महंमद बाबालाल शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास ईश्वरा चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कविता घाटगे होत्या. माजी अध्यक्ष आनंदा पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. अध्यक्षपदी महंमद शेख व उपाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची वर्णी … Read more

error: Content is protected !!