मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा पत्रकार फौंडेशनतर्फे सत्कार

निराधार, गरीब व गरजूंचे आधारकेंद्र ! – प्रा.सुनिल डेळेकर यांचे गौरवोदगार मुरगूड (शशी दरेकर) :मुरगूडच्या श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीतून विधायक वाटचाल केली . ही पतसंस्था अनेक गरीब ‘ निराधार गरजूंचे आधार केंद्र बनली आहे असे गौरवोदगार मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनचे अध्यक्ष प्रा . सुनिल डेळेकर यांनी काढले.येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण पत … Read more

Advertisements

धर्माच्या नावावर देश तोडण्याचा प्रयत्न सफल होणार नाही ! : नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सर्वधर्मीय रोजा इफ्तार संपन्न मुंबई, दि. 21 एप्रिल : देशात मागील काही वर्षांत धर्मा धर्मात फूट पाडून देश तोडण्याचे काम धर्मांध शक्ती प्रयत्न करत आहेत.  हा देश हिंदू मुस्लीम शिख ईसाई सर्व धर्मियांचा आहे. ज्या विभाजनवादी शक्ति द्वेषाचे विष पेरून देशात फूट पाडू पहात आहेत  त्यात ते सफल होणार नाहीत, असे महाराष्ट्र … Read more

शिष्यवृत्तीचे अर्ज 30 एप्रिल पर्यंत भरण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 21 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत भरावेत, असे आवाहन समाज कल्याण … Read more

निढोरीच्या ग्रामपंचायत झाडू कामगाराच्या मूलग्याचा प्रबोधनात्मक व्याख्यानाने वाढदिवस साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिक्षण हे व्यक्तीमहत्त्व विकासाचे महत्वाचे साधन असुन त्याचा विकास प्रक्रियेशी खुप मोठा संबंध येतो त्यामुळे युवकांनी शिक्षणावर विशेष भर द्यावा. समृद्ध जीवनासाठी युवकांनी व्यक्तिमहत्व विकास आणि कौटुंबिक विकासाला पहिलं प्राधान्य दिले पाहिजे त्यानंतरच राष्ट्रविकास सहज साध्य आहे. पण राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत शिवरायांच आणि भिमरायांच चरित्रच युवकांची विचारशक्ती आणि ह्दयशक्ती … Read more

जातीयवाद वाढू नये यासाठी मी, मंत्री मुश्रीफ व संजयबाबा एकत्रित काम करू – खासदार संजय मंडलिक

कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे कौलगे, दि. १९ : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू, असे प्रतिपादन खासदार संजयदादा मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही त्यांनी समरजित घाटगे यांचे नाव … Read more

धान व नाचणी विक्रीकरिता 30 एप्रिल पर्यंत नोंदणी करावी

कोल्हापूर, दि. 18 : ज्या शेतक-यांनी हंगाम 2021-22 मध्ये धान (भात) व नाचणी पिकाची रब्बी हंगामात लागवड केली आहे. तशी सातबा-यावर ऑनलाईन रब्बी लागवडीची नोंद आहे व त्यांना त्यांचा माल हमीभाव केंद्रावर विक्री करायचा आहे, अशा शेतक-यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 पूर्वी विक्रीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केले आहे. पणन हंगाम 2021-22 … Read more

करनूर गावातील श्री मरिआई देवी यात्रा उद्या

यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय कागल(विक्रांत कोरे) – कोरोणाच्या महामारीमुळे गेली तीन वर्षे झाले कागल तालुक्यातील करनूर येथील यात्रा झालेली नव्हती ,यावर्षी श्री मरिआई देवी यात्रा दणकेबाज करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत नेटके आणि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार तारीख 19 एप्रिल ते गुरुवार तारीख 21 एप्रिल पर्यंत … Read more

प्रत्यक्ष कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा मला सार्थ अभिमान – राजे समरजितसिंह घाटगे

सिद्धनेर्ली ता. १८ : दलित समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राजे बॅंकेतून राजर्षी शाहू महाराज कर्ज योजनेतून अर्थसाह्य केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारस म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. भारतरत्न … Read more

साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत – आप्पासाहेब खोत

मडिलगे ( जोतिराम पोवार ) : भावी पिढीच्या उद्धारासाठी साहित्य संमेलने ही काळाची गरज असून “साहित्यकारांनी आपल्या साहित्यातून समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत”असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.आप्पासाहेब खोत यांनी केले. ते मडिलगे खुर्द ता भुदरगड येथे आयोजित राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते. अक्षरसागर साहित्य मंच,शाश्वत विकास चळवळ आणि ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, यांच्या संयुक्त … Read more

समरजीतसिंह घाटगे यांच्या निषेधात मुश्रीफ समर्थकांचा विराट मोर्चा

कागल : गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तरीखेच्या तिथी वरून आरोप केलापासून कागल मधील वातावरण तापल असून आज समरजीतसिंह घाटगे यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. समरजीतसिंह घाटगे यांनीराम मंदिर परिसराचा वापर राजकीय कामासाठी केला जातो तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जन्मतारखेवरून बदनामी सुरु केली आहे. … Read more

error: Content is protected !!