निधन वार्ता
निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते
मुरगूड :मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
निधन वार्ता – प्रमिला रेंदाळे
मुरगूड ता. कागल येथिल प्रमिला महादेव रेंदाळे ( वय ७५ ) यांचे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. डॉ. महादेव रेंदाळे यांच्या त्या पत्नी तर सराफ व्यावसाईक बाबूराव रेंदाळे, आकाश रेंदाळे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जण व उत्तरकार्य सोमवार दि. … Read more
निधन वार्ता – यशवंत पोवार
श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.
निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील
श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.
निधन वार्ता – अलका तांबट
मुरगूड – मुरगूड येथील अलका महादेव तांबट (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुरगुडच्या श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व मुरगूड बाजारपेठ येथिल राज सायकल दुकानचे मालक महादेव तांबट यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुले, सून, मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षविर्सजन रविवार दिनांक ४ मे रोजी दत्त … Read more