सेवानिवृत्ती निमित्य ” तानाजी – नादवडेकर ” यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरुपली ता. कागल येथिल तानाजी बळवंत नादवडेकर यांचा आदमापूर येथिल बाळूमामा देवालयातून सिक्यूरीटी गार्ड या पदावरून १३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्दल माजी नगरसेवक मा. श्री. किरण गवाणकर व मित्रपरिवारातर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या अगोदर सैन्यदलात १७/ ८ / १९८४ मध्ये भरती होऊन दीड वर्षे ट्रेनिंगनंतर पहिली … Read more

आयफोनने केला अमरसिंहचा घात

बामणी येथील खुनातील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या कागल (विक्रांत कोरे) : खून करून मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथे टाकलेल्या खुनाचे रहस्य पोलिसांनी केवळ २४ तासात उलगडले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदरचा खून मयत अमरसिंह थोरात चे वडील व भाऊ या दोघांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा खुन केवळ चैनीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून … Read more

बामणी येथे सापडला तरुणाचा मृतदेह

कागल (विक्रांत कोरे) : धारदार हत्याराने बाहेरच्या गावात खून करून तो मृतदेह कागल तालुक्यातील बामणी येथील शेतात टाकला आहे. तो मृतदेह अमरसिंह दत्तात्रय थोरात वय वर्षे 30 राहणार गोठखिंडे तालुका वाळवा, जिल्हा सांगली याचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समजला. या खुनामुळे कागल … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात होणारा ३५० वा राज्याभिषेक सोहळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : अतिशय दिमाखदार पद्धतीने संयुक्त गावभाग व शिवप्रेमी मुरगूड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून रोजी संपन्न होणाऱ्या ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रायगड नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा राज्यभिषेक सोहळा म्हणून गेल्यावर्षीपासून या सोहळ्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. या राज्याभिषेक दिनांचे औचित्य … Read more

चिमगांवमध्ये दुर्मिळ गोलाकार विरघळ शिळा : शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थांचा संवर्धनाचा निर्धार

मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव (ता. कागल) येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार वीरगळच्या संवर्धन कार्यास शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या विरघळीचे संवर्धन करण्याचा शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी निर्धार करुन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. मुरगुडपासुन २ कि. मी. अंतरावर असलेल्या चिमगावामध्ये महाराष्ट्रात दुर्मिळ अशा गोलाकार विरघळ आहेत. दीड वर्षांपूर्वी शिवशक्ती … Read more

कागल मध्ये परत धूम स्टाईलने चोरी

मोटरसायकलला अडकलेली पैशाची पिशवी पळवली कागल (विक्रांत कोरे) : मुंबईकडे जाणार रस्ता कोणीकडे असा बहाना करीत अज्ञात दोन्ही इसमानी मोटरसायकल अडकलेली रुपये 65 हजाराची पिशवी घेऊन पोबारा केला. ही घटना दुपारी पावणे बाराच्या सुमारास रिंग रोडवर घडली. दिवसाढवळ्या भर दुपारी झालेल्या प्रकाराने घबराहट निर्माण झाली आहे. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कागलचे पोलीस … Read more

मुरगुड विद्यालयाची सह्याद्री कमळकर, वैष्णवी सुतार कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम

समरजीत घोरपडे विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम, प्रज्ञा कदम द्वितीय मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येतील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील सह्याद्री गणपती कमळकर व वैष्णवी आनंदा सुतार या दोघींनी 88.83% मार्क मिळवून कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम तर समरजीत दीपक घोरपडे … Read more

मुरगुड येथील शिवराज ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९७.५९%

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजचा एचएससी तथा बारावी बोर्ड परीक्षा २०२२ चा एकूण निकाल ९७.५९ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा साहिल संजय सूर्यवंशी पिंपळगाव बु॥ हा विद्यार्थी ९२.६७ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत कागल तालुक्यात दुसरा आला. आरती परशराम गिरीबुवा वाघापूर ही ८०.५० टक्के गुण … Read more

दिल्लीत महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवले

दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यानंतरही राज्यात गोंधळ घालणारे आमदार गोपीचंद पडळकर हे शांत का ? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी … Read more

कागल मधील टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक

कागल(विक्रांत कोरे): शनिवारी रात्री उशिरा शार्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत येथील परफेक्ट कॉम्प्यूटर टायपिंग इन्स्टिट्यूट जळून खाक झाले. या आगीत इन्स्टिट्यूटमधील ३० कॉम्प्युटर, महत्वाची कागदपत्रे, सर्टिफिकेट व फर्निचर आदी साहित्य जळून भस्मसात झाले. कागल येथील सुजाउद्दीन सय्यद यांचे निपाणी वेशीजवळ ब्रम्हाकुमारी केंद्रालगत परफेक्ट टायपिंग कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. ३१डिसेंबर १९८१ रोजी या संस्थेचे कामकाज … Read more

error: Content is protected !!