समरजीत घोरपडे विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम, प्रज्ञा कदम द्वितीय
मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येतील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील सह्याद्री गणपती कमळकर व वैष्णवी आनंदा सुतार या दोघींनी 88.83% मार्क मिळवून कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम तर समरजीत दीपक घोरपडे याने 82.17 टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम तर प्रज्ञा कदम हिने 82 टक्के मार्क मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज चा 96.67 टक्के निकाल लागला आहे.
शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान विभाग 100 टक्के, वाणिज्य विभाग 96.67 टक्के तर कला विभाग 94. 47% निकाल लागला आहे. शाखा निहाय गुणानुक्रमे प्रथम
विज्ञान शाखा समर्जित दीपक घोरपडे (82.17 केंद्रात प्रथम ), प्रज्ञा गणपती कदम( 82केंद्रात दुसरा ), निरंजन सुरेश कुंभार( 80.33) प्रतीक्षा संभाजी चौगले( 76.33)
कला शाखा..सह्याद्री गणपती कळमकर 88.83 कागल तालुक्यात प्रथम )वैष्णवी आनंदा सुतार( 88.83 कागल तालुक्यात प्रथम) पूजा दत्तात्रय ढोणे( ८०)दिशा बबन फगरे (78.50)
वाणिज्य शाखा..मनाली अशोक पाटील( 77. 17 प्रथम)
साक्षी सदाशिव कळंत्रे( 76 दुसरा)
तन्वी नामदेव जाधव (72 .67 तिसरा)
वैष्णवी पांडुरंग पाटील( 72. 50 चौथा)
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,युवा नेते, पेट्न कौन्सिल मेंबर , दौलतराव देसाई, कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जुनिअर कॉलेजचा यावर्षीचा निकाल चांगला लागल्याने पालक, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.