बातमी

सेवानिवृत्ती निमित्य ” तानाजी – नादवडेकर ” यांचा सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : सुरुपली ता. कागल येथिल तानाजी बळवंत नादवडेकर यांचा आदमापूर येथिल बाळूमामा देवालयातून सिक्यूरीटी गार्ड या पदावरून १३ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्दल माजी नगरसेवक मा. श्री. किरण गवाणकर व मित्रपरिवारातर्फे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला.

या अगोदर सैन्यदलात १७/ ८ / १९८४ मध्ये भरती होऊन दीड वर्षे ट्रेनिंगनंतर पहिली पोष्टींग फिरोजपुर केंट, दुसरी झांसी, तिसरी तालबेहट, चौथी जम्मू काश्मीर राजुरी पूच्छ सेक्टर, पाचवी अंबाला कॅट व शेवटी अरूणाचर प्रदेश ठेंगा कॅम्प पोष्टींग अशी सैन्यदलात सेवा बजावली .व ते-सेवानिवृत्त झाले .
देशाच्या सीमा आणि देशातील नागरीकांचे शत्रुपासून रक्षण करणे हेच कर्तव्य डोळ्यापुढे ठेऊन मी सैन्यदलात सेवा बजावल्याचे ते अभिमानाने सांगतात.

सेवानिवृत्त झालेनंतर गावाकडे येऊन आठ वर्षे शेती केली . त्यानंतर त्यानीं१३ वर्ष आदमापूर येथे बाळूमांमांच्या देवळात सिक्यूरीटी गार्ड म्हणून तन्मयतेने-सेवा बजावली व_ते तिथून सेवानिवृत्त झाले.

त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे मित्र परिवार जोडत गेला . लांबून आलेले बाळूमांमाच्या भक्त्ताच्या अनेक ओळखी वाढल्या गेल्या . त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याने सेवानिवृत्त प्रसंगी प्रत्यक्ष भेटून , फोनव्दारे , व्हॉटशॉपव्दारे , शुभेच्छांचा वर्षाव करुन तानाजीरावानां-दिर्घायुष्य लाभु दे अशा शुभेच्छा दिल्या .
या सेवानिवृत्त प्रसंगी सर्वश्री किरण गवाणकर , चंद्रकांत दरेकर , भगवान गुरव, पत्रकार शशी दरेकर , सनी गवाणकर , बाळासाहेब पाटील ( सावर्डे ) , लक्ष्मण तेली ( सोनाळी ) यांच्यासह मित्रपरिवार , नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *