ताज्या घडामोडी
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
कोल्हापूर : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण … Read more
6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर, दि.4 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. … Read more
महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र चळवळ
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे, अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गुट्टम केली असती. आज मुंबई मेट्रोपॉलिटीन आहे. ती कुण्या एका भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे. तो वाचला की … Read more
मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेने १०० कोटी ठेवीचे केले उदिष्ट पूर्ण
मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने १०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. यापुढील काळातही संस्थेची अशीच भरभराट होईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री . उदयकुमार … Read more
जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त कबनूर परिसरातील वाहतुक मार्गात बदल
कोल्हापूर दि. 13 : कबनूर, ता. हातकणंगले येथील जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुस दि. १५ ते २२ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या कालावधीत वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी व वाहनांना सुरक्षित पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम (१) (ब) अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दर्गा उरुस काळात कबनूर … Read more
मुरगूडच्या राणा मांगलेची बुलेट छब्या व बाशिंग भवरा बैलगाडी प्रथम
बैलगाडी शर्यतशौकिनांची प्रचंड गर्दी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूडात सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक , मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते ऍड . विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेच्या बुलेट छब्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने प्रथम क्रमांकांच्या सव्वा लाखाच्या रोख बक्षीसासह चषक पटकावला. सर पिराजीराव तलावा शेजारील माळावर बऱ्याच … Read more
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
कोल्हापूर, दि. 2 : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर कुटूंबांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येते, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे. अनुसूचित जातीच्या … Read more
ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सर्वसमावेशक कामकाज पार पाडावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. 17 : येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पूर्वनियोजन करुन आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना … Read more
लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी
कोल्हापूर प्रतिनिधी:- देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कणेरी मठावर वीस ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत … Read more