विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी आमदार अमल महाडिक यांनी नुकतीच केली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि भूमापन अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. … Read more

मुरगूड बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते २३ मे रोजी सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दि. २३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुरगूड येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रदान समारंभ आयोजित केला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ राहणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी पत्रकार … Read more

लोकशाहीत संघटनेला महत्त्व; गजाननराव गंगापुरे

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; ज्येष्ठांचा सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : जेष्ठांचा , नागरिकांचा उर्वरित काळ आनंदाचा व तणावमुक्त जावा ,त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात संघ सतत कार्यरत असून त्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी दिली. मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक … Read more

कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला.  भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ कागल येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या यात्रेंमध्ये माजी सैनिक, विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कागल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज … Read more

कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे  राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित नागरिक आणि रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ? मानवाधिकार आयोगाचा राज्यांना सवाल

धोकादायक कचऱ्याची सफाई हाताने करण्याच्या पद्धतीचे उच्चाटन करावे नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आज धोकादायक कचरा सफाईच्या संदर्भात राज्यांना थेट सवाल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १४ स्पष्ट निर्देशांनंतरही, आजही काही भागांमध्ये हाताने सफाईची पद्धत सुरू असल्याबद्दल आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पाठवलेल्या पत्रात … Read more

कागलजवळ भीषण अपघात: गोकुळ शिरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कागल ( प्रतिनिधी ) : कागल अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्त्यु झाला. आनंद पाल राहणार गोकुळ शिरगाव असे मयत इसमाने नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास महामार्गावरील लक्षमी टेकडी जवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या परीस्थिती कडे दुर्लक्ष करुन कार नंबर ka-23-n-7815 ही ट्रेलरला ओव्हरटेक … Read more

मंत्रालयात सामान्यांची धास्ती का? सामान्य नागरिकांचा मंत्रालयातील प्रवेशासाठी संघर्ष!

मुंबई: राज्याचे मंत्रालय, जे सामान्य जनता, गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या सेवेसाठी उभारले गेले आहे, त्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. कामांसाठी शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या सामान्य माणसांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओळखपत्र दाखवून, तासन् तास रांगेत उभे राहून आणि अनेक तपासण्या पार करून मंत्रालयात प्रवेश मिळतो. यामुळे मंत्रालयात येणाऱ्या … Read more

हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले ; नरकातला स्वर्ग पुस्तकातून खळबळजनक खुलासा ! 

मुंबई : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान हसन मुश्रीफ गृहमंत्री होता-होता राहिले, असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी केला आहे. ‘धर्म आडवा आला’ असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी “नरकातला स्वर्ग” हे पुस्तक … Read more

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सावर्डे बु॥ चा तरुण ठार

परीक्षेला जातानां रितेशवर काळाचा घाला मुरगूड ( शशी दरेकर ) : माद्याळ ता. कागल गावाजवळ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संतोष राणे यांच्या शेताजवळ भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सावर्डे बु || (ता. कागल ) येथिल मोटरसायकलस्वार रितेश तानाजी पाटील ( वय २१ ) हा जागीच ठार झाला. रितेश हा परिक्षेसाठी गडहिंग्लज येथे परिक्षेसाठी … Read more

error: Content is protected !!