कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला.  भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ कागल येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या यात्रेंमध्ये माजी सैनिक, विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Advertisements

कागल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. ऐतिहासिक गैबी चौकापर्यंत मुख्य मार्गावरून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. 

Advertisements

गैबी चौकातील शाहू महाराज ,महात्मा फुले , डॉ .बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदे मातरमाने या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.  कागल मध्ये तिरंगा  यात्रेचे आयोजन माजी नगरसेवक यशवंत उर्फ बॉबी माने, विजया निंबाळकर यांनी केले.  यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करून भारतीय सैन्य दलाचा जयजयकार केला. 

Advertisements

तिरंगा यात्रांचा  उद्देश देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत करणे, तसेच भारतीय सैन्याच्या मनोबलाला आणखी बळ देणे  हा मुख्य उद्देश असल्याचे  गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी सांगितले.  या यात्रेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अखिलेशराजे घाटगे, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी उपस्थिती लावली.   यावेळी केडीसीसी चे संचालक प्रताप उर्फ भैया माने,धनराज घाटगे, माजी नगरसेवक यशवंत उर्फ बॉबी माने, विजया निंबाळकर,  आदींनी मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमास चंद्रकांत गवळी, प्रविण काळभर,आप्पासो पाटील, रणजीत मुडूकशिवाले, मल्हारी पाटील, नानासो कांबळे, एकनाथ पाटील, अॅड अमर पाटील, अरून सोनूले, उत्तम वाडकर, आजी माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!