कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे  राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित नागरिक आणि रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Advertisements

यासोबतच, कागल परिसरातील वाय. डी. माने कॅम्पस येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकांसाठी विशेष प्रात्यक्षिक आणि माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप पसरवणारे डास, त्यांची अळी आणि डासांच्या सर्व प्रकारांविषयी सखोल माहिती देण्यात आली. डासांची उत्पत्ती स्थाने आणि ती नष्ट करण्याचे उपाय याबद्दल प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Advertisements

एकंदरीत, विविध माहितीपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून आज कागल शहरात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय, कागल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. टोणपे, डॉ. सुलभा पाटील, अधीक्षक राम सातवेकर, आरोग्य कर्मचारी  प्रकाश पवार, आरोग्य सेविका दिपाली सोनुले, राजश्री शेळके आणि जयश्री माने यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या योगदानाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

Advertisements

1 thought on “कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न”

  1. हे खूप छान आहे की तुम्ही समाजातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात. अशा प्रयत्नांमुळे लोकांना माहिती मिळणे सोपे होते. पण कधीकधी अशा बातम्यांची अचूकता कशी सुनिश्चित केली जाते? मला वाटते की यामध्ये जबाबदारीचा मोठा भाग आहे. तुमच्या मते, या बातम्या लोकांवर कसा परिणाम करतात? माझ्या मते, योग्य माहिती लोकांना सक्षम करते, पण चुकीची माहिती गोंधळ निर्माण करू शकते. तुम्ही याबद्दल काय म्हणाल?

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!