भक्तिभावाने कागल मध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता

कागल : कागलमध्ये आयोजित हरिनाम सप्ताहाची भक्तिभावाने सांगता झाली. २४ व्या वर्षी कागल मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक प्रयाण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. ६ मे ते गुरुवार दि. १२ मे पर्यंत श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित या सोहळ्यात अनेक हरी भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती.       या … Read more

Advertisements

कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरांचा धुमाकूळ

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या आठवडी बाजारात पुन्हा मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असून ग्राहकांच्या खिश्यातील मोबाईल हातोहात लंपास केले जात आहेत. याविषयी तक्रार करण्यास कागल पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस फोन चोरी ऐवजी गहाळची नोंद करत आहेत. जेणेकरून मोबाईल आणि मोबाईल चोराच्या तपासाच्या कटकटी पासून वाचता येईल. तसेच पोलिसांच्या उद्धट बोलण्याने नागरिक तक्रार करण्यास … Read more

महाबीज मंडळाचा गलथान कारभार

raju sheti

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या – माजी खास. राजू शेट्टी कागल : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात या वर्षी उन्हाळी सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले असून तीन जिल्ह्यातील जवळपास ३ हजार हेक्टरहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये … Read more

चितळे, भावेंवर गुन्हा नोंदवा – राष्ट्रवादीची पोलीस निरिक्षकांकडे मागणी

कागल : देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे अध्यक्ष खास. शरद पवार साहेब यांच्यावर गलिच्छ कविता करणारे अॕड.भावे व सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या केतकी चितळे यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीच्या वतीने कागल पोलिस निरिक्षक जाधव साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या अशी बदनामी … Read more

बी.ए.बी.एड.स्पे.(बॅच १९८८-८९) चा स्नेहमेळावा एकोंडीत संपन्न

सिध्दनेर्ली (वार्ताहर) : “स्नेहमेळाव्यातून आपल्या आरोग्याबरोबर माहिती आदान प्रदानाचे महत्वाचे कार्य पार पडते. वेळ प्रसंगी मित्रासारखा दुसरा आधार नसतो” असे उद्गार शिवाजीराव चाैगले यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातून सन १९८८-८९ साली बी.ए.बी.एड्.(स्पे.) ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वर्ग बंधू भगिनींचा स्नेह मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. हा स्नेह मेळावा एकोंडी ता. कागल … Read more

पोलीस असल्याची बतावणी २२ लाखाची लुटमारी

कागल /प्रतिनिधी : चांदीचा कच्चामाल व रुपये बावीस लाख घेऊन व्यापारी तामिळनाडू कडे चालला होता. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली. रुपये रुपये 22 लाख जबरदस्तीने घेऊन लुटमारी केली. सदरचा प्रकार तारीख 13 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल एम आय डि सी त घडला. केवळ 12 तासात लूटमार करणाऱ्यांच्या कागल … Read more

मुरगूड च्या स्मशानभूमीसच मरणकळा असल्याचे विदारक चित्र

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगुड ता.कागल येथील निढोरी पुलाजवळील स्मशानभूमीतील शेड मोडकळीस आल्याने येथील स्मशान भूमीस मरणकळा असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. मुळात नाका नंबर एक पासून तब्बल एक किलोमीटर लांब असलेले ही स्मशानभूमी सध्या अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. शेडच्या वरील लोखंडी पाईप गंजल्याने त्या केव्हाही वरच्या पत्र्यासह तुटून पडण्याची शक्यता आहे. वरचे … Read more

जिल्हा परिषदेच्या 10127 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर, दि. १२ : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 10 हजार, 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा … Read more

कार्यकर्त्यांच्या बाबतीत तडजोड नाही : संजयबाबा घाटगे

केनवडेत विविध संस्थांतील विजयी उमेदवारांचा सत्कार व्हनाळी(वार्ताहर) : सत्ता, साधने नसतांना अनेक राजकीय वादळी लढ्यात कार्यकर्त्यांनी साथ दिली. कार्यकर्त्यांच्या भवितव्याबाबत कोणतीच तडजोड करणार नाही. आम्ही गोकूळ दूध संघात प्रतिनिधीत्व करत असताना गोकुळने आमच्या विरोधात काम केले. नेत्यांवर आम्ही प्रेम, आदर व निष्ठेने त्यांच्या सोबत राहीलो पण लाचारी पत्करली नाही. म्हणूनच पी.एन.पाटील वगळता जिल्ह्यातील कोणत्याच नेत्याने … Read more

एकल महिलांना रोजगार मिळून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य द्या : उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात या साथीने आपला पती दगावलेल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याबरोबरच या महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अनेक महिला उच्च शिक्षित आहेत त्यांना रोजगारस्वयंरोजगार मिळवून पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य करा. ही आपत्ती एका महायुद्धानंतर झालेल्या स्थिती समान आहे, त्यामुळे पुढील चार … Read more

error: Content is protected !!