कु. यशश्रीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

कागल (विक्रांत कोरे) : एकोंडी (ता.कागल) येथील कु. यशश्री गणपती धनगर (पुजारी) हिचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी कुमार व कन्या विद्यामंदिर, सिद्धनेर्ली येथील शाळेतील २०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्य, केळी, दुपारच्या जेवणात शिरा तसेच अंगणवाडीतील १५० मुलांना जेवणाचे प्लेटा तसेच केळी व पेन्सिल वाटप करून साजरा करण्यात आला. … Read more

Advertisements

कागल बसस्थानक परिसरातील टवाळीखोरांना दाखविला कायद्याचा धाक

कागल(विक्रांत कोरे): कागल बसस्थानक परिसरात टिंगल टवाळी करीत फिरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना कागल पोलीस ठाण्याच्या महिला सिंघमने दाखविला कायद्याचा धाक. त्यामुळे तरुणांच्या मध्ये चांगलीच धडकी बसली आहे. त्याचबरोबर विद्यालयीन तरुणीनाही कायद्याचे प्रबोधन केले. सकाळचे अकरा वाजून गेले होते. महाविद्यालयाची सुट्टी झाली होती. बस स्थानक परिसर विद्यार्थ्यांनी गजबळून गेला होता. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुमार … Read more

भडगावच्या उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले

मुरगूड ( शशी दरेकर ) : भडगाव तालुका कागल येथील उपसरपंच पदी पुंडलिक भांडवले निवड झाली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप चौगले होते. उपसरपंच आनंदा गोविंद सुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री भांडवले यांची उपसरपंच पदी निवड झाली. श्री भांडवले हे बिद्री सह साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक प्रविसिंह पाटील गटाचे आहेत. यावेळी एम. एस. … Read more

पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा पर्वणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी -हत्ती महाल पासून जवळ असणाऱ्या ” राऊतवाडी ” धबधबा सध्या चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून या धबधब्याकडे आजुबाजूच्या हिरवाईचे निसर्गसौदर्यासह नेत्रसुखद आनंद घेत पावसाळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. राऊतवाडी धबधब्यासह काही ठिकाणी , परिसरात लहान -मोठे धबधब्याचे आकर्षण आता सर्वांनाच वाटू लागले आहे .राऊतवाडी … Read more

साके येथे डोळे तपासणी शिबीर

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन – साके ग्रामपंचायतीचा उपक्रम व्हनाळी – सागर लोहार : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन कागल तालुका, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने साके ता.कागल येथे विठ्ठल मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणी शिबीराचा शुभारंभ डिस्ट्रीक्ट रिपोटर्स चे … Read more

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला शिवसेना पक्ष : संजयबाबा घाटगे

केनवडे येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 500 सदस्य नोंदणी व्हनाळी (सागर लोहार) : जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर शिवसेनेचे समाजकार्य अखंडपणे सुरू आहे. ठाकरे कुटूंबियांमुळेच मुंबई सुरक्षित असून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला पक्ष म्हणजे शिवसेनाच होय. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून … Read more

मुरगूड येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्य चित्रकला स्पर्धा उत्साहात

स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांचा सहभाग मुरगूड(शशी दरेकर) : शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त मुरगूड केंद्रात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत १७३९ विद्यार्थ्यांनी आपले भावविश्व कागदावर रेखाटले. मुरगुड येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये या स्पर्धा उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन शाहु साखर कारखाना संचालिका सौ.रेखाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शाहू महाराज पुतळा पूजन … Read more

डॉ. तनिष पाटील यांना आर्थोप्लास्टीची फेलोशिप प्राप्त

सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : सिध्दनेर्ली गावाचे सुपुत्र व सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आर्थोपेडिक डिपार्टमेंटचे डॉक्टर तनिष पाटील यांनी नुकतीच पुणे येथून आर्थोप्लास्टी ची फेलोशिप प्राप्त केली आहे. डॉ. तनिष पाटील हे MBBS, M.S. Surgen असून त्यांनी २०१९ मध्ये हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथून आर्थोस्कोपी फेलोशीपही घेतली आहे .पाटील यांना मिळलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाटील यांना मिळालेल्या … Read more

सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागल (विक्रांत कोरे) : दि कागल एज्युकेशन सोसायटी, कागल संचलित सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, कागल. शाळेत एस्. एस्. सी. परीक्षा मार्च- २०२२ या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये १) कु. श्रावणी महादेव गवळी कागल केंद्रात प्रथम, २) कु. सानिया सुभाष कालेकर कागल केंद्रात द्वितीय, ३) कु. अंजली … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीचा उच्चांक

डिस्टिलरी व कोजन हंगाम समाप्त कागल : बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीमध्ये उच्चांक निर्माण केला आहे. कारखान्याच्या या यशात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. कारखान्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते माझा यांचा सत्कार झाला. यावेळी हंगाम समाप्ती निमित्त सत्यनारायणाची … Read more

error: Content is protected !!