मुरगूडच्या ” एम .जे. अँग्रोचे ”नवीन अद्यावत कार्यालयाचे पुणे येथे शानदार उदघाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्या एम .जे. अँग्रो इंडस्ट्रीजच्या नवीन अद्यावत कार्यालयाचे उदघाटन समारंभ कोथरूड पुणे येथिल चांदणी चौक येथे मोठया उत्साहात पार पडला. आम. हसन मुश्रीफ ( माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते तसेच श्री. अभय मांडरे (प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तथा अद्योजक पुणे) यांच्या प्रमुख … Read more

Advertisements

मुरगूड मधल्या महालक्ष्मी नगरातील पूर्व बाजूचा १५ मीटर रस्ता त्वरीत करावा निवेदनाद्वारे मागणी

मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामधल्या महालक्ष्मी नगरातील पूर्व बाजूचा १५ मीटर रस्ता करावा अशी मागणी महालक्ष्मीनगर व मांगोरे , कॉलनीतील नागरीकांनी मुरगूड नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदना०दारे केली आहे. निवेदन या कॉलनीत वास्तव्यास असलेले सिकंदर जमादारसह अन्य आठ रहिवाशांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. मागणीच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, सहायक संचालक, नगररचना कोल्हापूर, संचालक नगररचना … Read more

आमदार हसन मुश्रीफ यांच्या लक्ष्यवेधीला सहकार मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मुंबई, २५ ऑगस्ट : कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीककर्जाची उचल करता आली नव्हती. या शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत कर्ज घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील असे ९२,०८८ शेतकरी महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ पासून वंचित राहू नयेत, … Read more

करनूर- वंदूर येथील विद्यार्थ्यांना जादा बस मिळावी आंदोलनाद्वारे केली मागणी

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील विद्यार्थ्यांचे एसटी बस थांबत नसल्यामुळे होत आहे शैक्षणिक नुकसान. ग्रामपंचायत ने वारंवार एसटी आगर प्रमुखांकडे निवेदनाद्वारे जादा बसची मागणी करून सुद्धा याची दखल घेतली जात नाही. यामुळे करनूर येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी, पालक वर्ग, ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी एसटी बसेस अडवून आंदोलन केले. यावेळी करनूर मध्ये कागल- … Read more

मुरगुडमध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड तालुका कागल येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडली. प्रारंभी युवा नेते सत्यजित पाटील (आबा), दिग्विजयसिंह पाटील ( भैय्या )यांच्या शुभहस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी पांडुरंग उपलाने महाराज अवचितवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये त्यांनी संत सेना … Read more

कागल मध्ये संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

कागल(विक्रांत कोरे) : कागल येथे नाभिक संघटनेच्या वतीने शिरोमणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याप्रसंगी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालखी सोहळ्यास व नगर प्रदक्षिणास विठ्ठल मंदिर … Read more

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्षपदी सुषमा देसाई; महिला सहचिटणीस पदी वृषाली पाटील व पूनम पाटील; तर चंद्रकांत मंचरे व बाबासाहेब वाघमोडे यांची सहचिटणीस पदी निवड

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्ष पदी सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची तर महिला सहचिटणीस पदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता पूनम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सह चिटणीस म्हणून राज्यकर उपायुक्त चंद्रकांत मंचरे … Read more

भाजप संसदीय मंडळात मराठी नेता नसणे हा महाराष्ट्राचा अपमान

भाजप नेते आनंद रेखी यांचा पक्षाला घरचा अहेर मुंबई : समाजकारणापासून राजकारणात अव्वल असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैली तसेच ‘व्हिजन’मुळेच जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पक्षाला केंद्रासह अनेक राज्यात सत्तेवर बसवले आहे. देशासह जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन अशी ओळख पार्टीची आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक वारसा घेवून राजकारणात यशस्वी झालेल्या भाजपला वाढवण्यात अनेक मराठी … Read more

मुरगूडच्या श्री विठ्ठल रखूमाई सह ग्राहक संस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार

मुरगूड ( शशी दरेकर ) : संस्थेंचे जेष्ठ सभासद पांडूरंग चांदेकर यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथराव पाटील (आण्णाजी) यांच्या फोटोला पुष्पहार घालून सभेस प्रारंभ झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रविणसिंह पाटील (दादा),व्हा चेअरमन वसंतराव शिंदे व सर्व संचालक उपस्थित होते.सभेचे स्वागत व प्रास्ताविक चेअरमन प्रविणसिंह पाटील (दादा) यांनी केले.यावेळी सचिव सुधीर मोहीते यांनी विविध विषयाचे … Read more

उद्योजक व नवउद्योजकांसाठी सोमवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचा नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर :  शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ गगनबावडा तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, याउद्देशाने म.ह.शिंदे महाविद्यालय, सभागृह तिसंगी येथे सोमवार, दिनांक 22 ऑगस्ट रोजी ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे व शासनाच्या योजनांचा लाभ … Read more

error: Content is protected !!