मुरगूड परिसरातील सर्वाधिक नफा मिळवणारी पतसंस्था म्हणून ख्याती
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विश्वसनीय पतसंस्था म्हणून ख्याती असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . अहवाल सालात २ कोटी१ लाख निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन उदयकुमार शहा यानीं दिली.
पुढे शहा म्हणाले अहवाल सालात संस्थेकडे ७८ कोटी ५ लाख, ठेवी आहेत. ६२ कोटी४३ लाख कर्जे वितरीत केली आहेत. पैकी २३ कोटी २६ लाख सोने तारण कर्ज आहे . गुंतवणूक २५ कोटी २८ लाख केली आहे. एकूण व्यवहार ५५३ कोटी १४ लाख झाला असून थकबाकी ० .२७ टक्के आहे.
संस्थेला ऑडिट वर्ग ” अ ” मिळाला आहे . यावेळी ते पुढे म्हणाले सभासदानां येत्या दिपावलीनिमित्य५ लिटर खाद्यतेल वाटप व सभासदानां १५ टक्के डिव्हिडंड देणार असल्याचे जाहीर करुन अशाच प्रकारे संस्था उत्तरोत्तर प्रगतीची गरूड भरारी घेत राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी चेअरमन श्री . उदयकुमार शहा , ‘ व्हा . चेअरमन श्री . प्रकाश हावळ, संचालक सर्वश्री एकनाथ पोतदार , आनंदराव देवळे , मारुती पाटील , सुखदेव येरुडकर , सोमनाथ यरनाळकर, राजाराम कुडवे, आनंदा-जालिमसर , दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . रुपाली भारत शहा , सौ .रेखा खाशाबा भोसले , कार्य लक्षी संचालक राहुल शिंदे , कर्मचारी वर्ग , सभासद मोठया संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाचे -सूत्रसंचालन सात्ताप्पा चौगले यानी केले . संचालिका अँड सौ . रेखा भोसले यानी स्वागत तर आभार संचालक श्री . सोमनाथ यरनाळकर यानीं मानले.