शिवराजच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप

मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील शिवराय विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड मधील राष्ट्रीय हरित सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळशी विवाह निमित्त तुळशी पूजनासाठी विद्यार्थ्यांना तुळशी रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज चे उपमुख्याध्यापक आर. बी. शिंदे होते. तुळस ही बहुगुणी वनस्पती असून आयुर्वेदामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या पुराणग्रंथांमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे एक … Read more

प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड प्रदान

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल -सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना पुणे येथे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य डॉ. एस. एन. पठाण यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड २०२३ गौरवपूर्ण समारंभात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह … Read more

कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली : पालकमंत्री हसन मुश्रीफ

बिद्रीच्या निवडणूकीतील सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचा वाघापुरातून प्रचार शुभारंभ मडिलगे (जोतिराम पोवार) : मागील सात वर्षे राज्यात उच्चांकी उस दर देणाऱ्या आणि विविध प्रकल्पांच्या पूर्णत्वामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या बिद्री साखर कारखान्याची बदनामी करणाऱ्या विरोधी मंडळींना मते मागण्याचा अधिकार नाही. राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेल्या आणि कारखान्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकविण्याची वेळ आली … Read more

सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयाचे प्रा. डॉ . शिवाजी होडगे आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मॉरिशसला रवाना

मुरगूड ( शशी दरेकर ) – मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व अभ्यास दौऱ्यासाठी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी होडगे नुकतेच रवाना झाले आहेत. भारत मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध, कला साहित्य आणि संस्कृती यास अनुसरून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मॉरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 आणि 24 … Read more

२४ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला आठवणींचा वर्ग

मुरगुड विद्यालयच्या माजी विद्याथ्यानीं केली लाखाची मदत मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड विद्यालय हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या शाळेच्या इयत्ता दहावी 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी कडून गुरु शिष्यांचा स्नेह मेळावा मुरगुड विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समवेत उत्साहाने पार पडला, तब्बल 24 वर्षानी जणु आठवणींचा वर्ग या ठिकाणी भरला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे … Read more

मुरगूड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाला ३५०० रू. भाव मिळाला पाहिजे व मागील वर्षाचे थकबाकीचे ४०० रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी मुरगूड येथे देवगड निपाणी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल तासभर आंदोलकांनी रस्ता अडवून धरला होता. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांनी ग्रामदैवत अंबाबाई मंदिर ते नाका … Read more

नाम. मुश्रीफ, खास. मंडलीक, समरजीतसिंह घाटगे यांची ऊसदर देण्यासाठी गट्टी

मुरगुड येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना,हसन मुश्रीफ ,खासदार संजय मंडलिक,शाहु चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची ऊस दर देण्याबद्दल गट्टी कशी होते असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुरगुड येथील ऐतिहासिक तुकाराम चौक येथे राजू शेट्टी यांची … Read more

मुरगूड येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य समाजात – दिपस्तंभासारखे – डॉ अर्जुन कुंभार

मुरगूड ( शशी दरेकर ) – मी माझं मला मध्ये रमलेला समाज असतांना उपेक्षित समाजासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत एक आगळी वेगळी भाऊबीज साजरी करणाऱ्या वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे कार्य समाजात दिपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी केले. ते येथील वनश्री रोपवाटिकेच्या वतीने आयोजित सार्वजनिक भाऊबीज कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत … Read more

सानिका फौंडेशनचे काम आदर्शवत : बटू जाधव

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सानिका फौडेशन यांचे काम गेली पंधरा वर्षे मी पाहत आलो आहे . त्यांचं काम खरोखरच गरजू व गरिबांना त्यांचे कायम सहकार्य असते. सानिका फाउंडेशन वतीने विविध आंदोलने होत असतात तसेच दगडू शेणवी हे कायमच देणाऱ्याच्या पंगतीत असतात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो .त्यांचे हे काम आदर्शवत असल्याचे … Read more

error: Content is protected !!