गर्भपात प्रकरणी कागल पोलिसांनी केली डॉक्टरसह चौघांना अटक

कागल/ प्रतिनिधी : गर्भपात व अनैसर्गिक संभोग याप्रकरणी गर्भपात करणारे डॉक्टर पीडित महिलेचा पती सासू व डॉक्टरांना मदत करणारा सफाई कामगार या चौघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेचा पती मुख्तार जमादार सासू यास्मिन जमादार दोघेही राहणार कागल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिग्विजय अभय पाटील, राहणार शनिवार पेठ कोल्हापूर सफाई कामगार राजू केशव चव्हाण राहणार … Read more

Advertisements

जी. एन. एम. अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागलमध्ये वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या जी. एन. एम. अभ्यासक्रमाची सुरुवात कागल, दि. १४ : कागल एज्युकेशन सोसायटीने जी. एन. एम. हा अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या शिक्षण संस्थेने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच कागलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य … Read more

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हा व्यवस्थापक एस. आर. बडगुजर

 कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पद्धतीने बिनव्याजी थेट कर्ज (रक्कम १ लाख रुपये) योजना २५ टक्के बीजभांडवल योजना व ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. आर. … Read more

स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन

मुरगूडच्या नागरिकांचा नगरपालिकेस इशारा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड – निढोरी रस्त्यावरील म्हारकीच्या पुलाजवळ असलेल्या स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती एका महिन्यात न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेस निवेदनाद्वारा मुरगूड मधील नागरीकांनी दिला आहे. मुरगूड नगरपरिषदेस नुकतीच १०० वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुरगूडची लोकसंख्या सुमारे १२ हजारांच्या आसपास आहे. मुरगूडची लोकसंख्या आणि विस्तार … Read more

मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) :येथील मुरगूड शहर नाभिक संघटनेची नुतन कार्यकारिणी निवड नुकतीच झाली त्यामध्ये मुरगूड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी विनोद रणवरे यांची उपाध्यक्षपदी गुंडा माने यांची तर सचिवपदी सचिन राजेंद्र रणवरे आणि खजिनदारपदी विलास रणवरे यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षी प्रमाणे नुतन कार्यकारीणी निवडीसाठीची मुरगूड शहर नाभिक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली . … Read more

घटस्थापना म्हणजे कृषी संस्कृतीतील माती परिक्षण व बीज उगवण क्षमता तपासणीचा प्रयोग होय – निसर्गमित्र अनिल चौगुले

राष्ट्रीय हरितसेना शिवराज विद्यालयचा पर्यावरण पुरक नवरात्रोत्सव उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) – घटस्थापना म्हणजे कृषी संस्कृतीतील माती परिक्षण व बीज उगवण क्षमता तपासणीचा प्रयोग होय.असे प्रतिपादन निसर्गमित्र कोल्हापूरचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले. ते येथील शिवराज विद्यालय ज्युनि. कॉलेज मुरगूडच्या राष्ट्रीय हरितसेना महाराष्ट्र राज्य अंतर्गत ‘पर्यावरण पुरक नवरात्रोत्सव साजरा करूया ‘ या विषयावर … Read more

चला..! कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया..!

कोल्हापूरचा शाही दसरा देशभरात प्रसिध्द असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्थान काळात तर हा दसरा राजेशाही थाटात.. मोठ्या दिमाखात साजरा होत होता. कोल्हापूरचा हा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील आहे. यावर्षी दसऱ्या दिवशी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या सीमोल्लंघनाबरोबरच राजेशाही परंपरा कायम ठेवत भव्यदिव्य पध्दतीने शाही … Read more

मुरगुडमध्ये आज शिवरथाचे जल्लोषात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : मंगळवार दि.10 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या शताब्दी निमित्त मुरगूड नगरी मध्ये शिव रथाचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत पुष्पवृष्टी करत या रथाचे मुरगुड येथील शिवतीर्थावर स्वागत करण्यात आले. संयुक्त गाव भाग मुरगुड व मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी , शिवराज विद्यालय … Read more

विनयभंग केल्याप्रकरणी संशयित व्यक्तीस अटक

कागल/ प्रतिनिधी : कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथील विद्यामंदिर व्हन्नाळी या शाळेतील बाल विद्यार्थिनींचा लैंगिक खेळ केला. मुलींना पट्टीने हातावर पायावर मारहाण केली, त्यांच्या अंगावर वह्या फेकणे या कारणावरून तेथील एकावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुळशीदास सदाशिव माने राहणार बामणी तालुका कागल असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी माने हा अल्पवयीन पीडित मुलींचा … Read more

मुरगुड विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे येथे संपन्न झालेल्या कागल तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक क्रीडा प्रकारात मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड च्या 14 व 17 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची पेठवडगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी … Read more

error: Content is protected !!