प्रपंचाला परमार्थाची साथ असेल तर मानवी जीवनाचे सार्थक होते – अनिता बहेनजी

व्हनाळी: वार्ताहर मानवी जीवनात प्रपंचाला परमार्थाची साथ असेल तर मानवी जीवन सुकर होऊन जीवनाचे सार्थक होते व आत्मिक समाधान लाभते असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी अनिता बहेनजी यांनी केले. बाचणी (ता.कागल) येथील ब्रम्हाकुमारीय ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा बाचणीच्या वतीने आयोजीत “दैवी गुणांच्या व्दारा लक्ष्मीचे आवाहन” या दीपावली निमित्त आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी श्री लक्ष्मीचे देवीचे … Read more

Advertisements

लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभासदांना ३३ लाखाच्या भेटवस्तूंचे वाटप

मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ३३१५ सभासदांना ३३ लाख रुपयांच्या दिवाळी भेटवस्तू वितरित केल्या. संस्था सेवकांना १२ लाख रुपये बोनस वाटप केले. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण केले. अध्यक्षस्थानी चेअरमन पुंडलिक डाफळे होते.  डॉ. देशमुख म्हणाले, संस्थेला १ कोटी १५ लाखांवर निव्वळ नफा झाला … Read more

करनूर विद्यालय जुनियर कॉलेज च्या सौ शाकेरा मुजावर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

कागल(विक्रांत कोरे) : रोटरी क्लब ऑफ गार्गीज् कोल्हापूर यांच्या मार्फत देण्यात येणारा सन 2021 -22 वर्षाचा नेशन बिल्डर अवार्ड गुणवंत शिक्षिका पुरस्कार करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ. शाकेरा हरुण मुजावर यांना देण्यात आला. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात माजी प्रांतपाल आर. आय डिस्ट्रिक्ट संग्राम पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. गतवर्षी डी. बी पाटील … Read more

शिवानी कानकेकर यांना राज्यस्तरीय उडान शिक्षकरत्न पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): कोगील खुर्द (करवीर ) येथील विद्यामंदीर शाळेच्या अध्याlपिका सौ .शिवानी चंद्रशेखर कानकेकर ( कोल्हापूर ) यांना उडान फौंडेशन कोल्हापूर यांनी राज्यस्तरीय उडान शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी सौ . कानकेकर यांना पॅट्रीयट स्पोर्टस् ग्रुपचा २००६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजचा २०१८ नेशन बिल्डर ॲवाॅर्ड, महाराष्ट्र … Read more

पतसंस्थाच सामान्यांचा मोठा आधार ; संजय घाटगे
केनवडे येथे अन्नपूर्णा पत संस्थेमार्फत सभासदांना 13 टक्के डेव्हिडंट वाटप

व्हनाळी(सागर लोहार) : ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी यांचे आर्थिक गणित हे पिकांच्या बाजारभावावर अवलंबून असते पण गत दोन वर्षे आलेला कोरोना ,वाढलेली महागाई यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे अशा अडचणीतील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील पतसंस्था हाच मोठा आर्थिक आधार ठरत आहे असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले केनवडे ता कागल येथे अन्नपूर्णा … Read more

‘अन्नपूर्णा’ ची दीड कोटींची एकरकमी बिले शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग चेअरमन संजय बाबा घाटगे ची माहिती; ऊसतोड वाहतूक यांचा समावेश

व्हनाळी(सागर लोहार) : केनवडे तालुका कागल येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याकडे 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत पुरवठा झालेल्या ऊस बिलांची एकरकमी प्रति टनास 2903 प्रमाणे १ कोटी ३६ लाख रक्कम तसेच ऊस तोडणी वाहतूक बिले ३३ लाख अशा सुमारे दीड कोटींच्या एकरकमी बिलांची रक्कम ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची … Read more

स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात केले ७० लाख रुपयांचे वाटप

सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील):- येथील शाहू ग्रुपअंतर्गत स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात ७० लाख रुपयांचे वाटप केले. विविध संस्थांच्या ३२ कर्मचाऱ्यांना ४३ टक्के इतका उच्चांकी बोनस सुद्धा वाटप केला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते त्याचे वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्थेचे संचालक आनंदा … Read more

सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा

कागल : श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेच्या वतीने वसुबारस दिन साजरा करण्यात आला. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दूध उत्पादकांनी देशी गाईंच्या संगोपनासाठी अधिकचे प्रयत्न करावेत असे आवाहन व्ही.जी. पोवार यांनी केले. संस्थेचे चेअरमन मधुकर आगळे व व्हा. चेअरमन शिवाजी मगदूम यांच्या हस्ते गायीचे पूजन करण्यात आले.यावेळी … Read more

कागलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कागलचे सुपुत्र वैभव रमेश कळमकर यांची मुंबई क्रिकेट टीम मध्ये निवड

सर्वोत्कृष्ट खेळाडू पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाखाली विकेट कीपर व बॅट्समन साठी वैभव कळमकर निवड कागल : कागल शहरातील तरुण युवा खेळाडू वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट असोशियन टीम मध्ये निवड झाल्याबद्दल कागल शहर व परिसरात या तरूण खेळाडूचे कौतुकाचा वर्षाव होत आहे वैभव कळमकर यांची मुंबई क्रिकेट मध्ये विकेट किपर व बॅट्समन साठी निवड झाली. … Read more

मुरगूडच्या ” शिवम् लोहार “यानें अनेक सापानां दिले जीवदान

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता . कागल येथिल शिवम् कृष्णा लोहार यानें अलिकडे अनेक सर्पानां जीवदान दिले , त्यामध्ये नाग , धामीण , घोणस , सापटुळी , अजगर , अशा अनेक जातीच्या सर्पानां जीवदान दिले आहे. नुकतेच कुरणी ( ता. कागल ) येथिल शिवानंद पाटील यांच्या घरी ” घोणस ” जातीचा अती विषारी … Read more

error: Content is protected !!