वाघापूरच्या युवकांनी अखंड जपलीय बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांचे सेवा व्रत

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील तब्बल 40 युवकांनी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांची राखण तसेच परिसरात श्रमदान करून गेली बारा वर्षाची अनोखी व अखंडित परंपरा चालू ठेवलीय येथील लाल बावटा तालुका संघटक बबन जठार व रामचंद्र भोई यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे ते गावातील युवकांना घेऊन आषाढ … Read more

कागल तालुक्यातील दुधगंगेत सापडल्या चार मानवी कवटया

तालुक्यासह सीमाभागात एकच खळबळ मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटया आढळल्या. यामुळे तालुक्यात भीतीदायक खळबळ उडाली आहे. कागल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या कवट्या ताब्यात घेतल्या. याबाबत अधिक माहिती अशी, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक … Read more

कृषी दिन ( १ जूलै )

कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, … Read more

मुरगूड येथील प्रविण सुर्यवंशी यांना वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड (ता.कागल) येथील पर्यावरण संवर्धनाच्या उद्दात हेतूने गेल्या २५ वर्षात ४ लाख रोपांची निर्मिती करून त्याचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत गेले दोन तप आपल्या जीवनाला वाहून घेतलेल्या मुरगूड येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांना २०२३ चा राजार्षि शाहू प्रेरणा गौरव सन्मान राज्यस्तरीय वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार २०२३ ने सन्मानित … Read more

सरवडेच्या जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्ये बालचमुंनीं आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.श्री. विठ्ठल -रूक्मिणी, वारकरी , तर कोणी संतांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी टाळ – मृदुंग, भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जणू पंढरपूरच्या वारीत असल्याचे जाणवत होते .यावेळी कार्यक्रमात सरवडेगावच्या … Read more

बकरी ईद दिवशीच 30 हजार रुपये किंमतीचा बोकड डि पी ला शाॅक लागून जागीच मरण

मुरगूड (शशी दरेकर) : कापशी ता कागल येथे माय्याप्पा डोणे यांचा कळप कापशी लिंगनुर रस्त्याने जात असताना रस्त्याच्या साईटला विद्युत डी पी होता. रस्त्याने जात असताना कळपातील एक बकरे त्या डीपी खाली चरण्यासाठी गेले. डीपीला करंट उतरल्यामुळे तो करंट बकऱ्याला लागून बकरे मरण पावले. ही घटना यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष मा श्री सिध्दू … Read more

मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. दत्तात्रय शामराव कदम (मुरगूड, ता. कागल) असं त्याचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय कदम याचा मुरगूड येथे आयुर्वेदिक … Read more

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील … Read more

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसांचे संचलन

मुरगूड (शशी दरेकर) : बकरी ईदच्या व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीसानीं बुधवारी सकाळी प्रमुख मार्गावरुन संचलन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील बाजारपेठेतून राजीव गांधी चौक, राणाप्रताप चौक, शिवतीर्थ, एस .टी स्टँड, ग्रामदैवत अंबाबाई मंदीर, हुतात्मा तुकाराम चौक या मार्गावरून संचलन करण्यात आले. कापशी, चिखली येथेही संचलन करण्यात आले. सहायक पोलीस … Read more

देवशयनी आषाढी एकादशी महात्म्य

आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. गुरुवार २९ जून रोजी … Read more

error: Content is protected !!