कृषि दिन हा १ जूलै रोजी हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून, हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. कृषी दिन हा कृषिप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने कृषी दिन साजरा करूया. 1 जुलै ते 7 जुलै हा कालावधी कृषी सप्ताह म्हणुन दरवर्षी साजरा केला जात असतो.
महाराष्ट्र कृषी दिन हा दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्टातील हरित क्रांतीचे जनक म्हणुन ओळखले जात असलेल्या महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेतकरयांसाठी दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाच्या आठवणीत दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो.
वसंतराव नाईक यांनी शेतकरयांच्या शेतीविषयक समस्या हाताळल्या होत्या. ज्यात त्यांनी आपले मुख्य लक्ष महाराष्टामधल्या धान्याच्या समस्या सोडविण्याकडे दिले होते. महाराष्ट धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण व्हावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते.वेळप्रसंगी त्यांनी महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण न झाल्यास मी फाशी घेईल असे देखील स्पष्टपणे ठामपणे सांगितले होते.यावरून आपणास कळुन येते की त्यांच्या मनात शेती आणि शेतकरी या दोघांविषयी किती कळकळ होती.हे दोघेही त्यांच्या किती जिव्हाळयाचे होते.
महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व
- हा दिवस शेतकरयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारया वसंतराव नाईक यांच्या आठवणीत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.
- हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीविषयक अडचणी समस्या व्यासपीठावर मांडण्याचा एक उत्तम दिवस आहे.
- या दिवशी शेतकरींच्या समस्यांवर चर्चा केली जाते.शेतकरी बांधवांच्या सर्व शेतीविषयक समस्यांवर मुख्यत प्रकाश टाकला जातो.आणि त्या सोडविण्यासाठी विविध योजना मोहीम शासनाकडुन तयार केल्या जातात.
- शेतकरयांसमोर असलेल्या अडचणींवर विचार केला जातो त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते.थोडक्यात हा दिवस महाराष्टातील सर्व शेतकरींना समर्पित दिवस असतो.ज्यात शेती आणि शेतकरी या दोन बाबींचाच विचार केला जातो.