बातमी

वाघापूरच्या युवकांनी अखंड जपलीय बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांचे सेवा व्रत

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथील तब्बल 40 युवकांनी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांची राखण तसेच परिसरात श्रमदान करून गेली बारा वर्षाची अनोखी व अखंडित परंपरा चालू ठेवलीय येथील लाल बावटा तालुका संघटक बबन जठार व रामचंद्र भोई यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे ते गावातील युवकांना घेऊन आषाढ एकादशी निमित्त बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांची राखण व श्रमदानाचा अनोखा उपक्रम राबवत आहेत.

मामा नेहमी म्हणतात…. जो कोणी माझ्या शेळ्या मेंढ्यांची सेवा करील…. त्याची मी राखण करीन….. इथं नीतिमत्तान वागा… नाहीतर थोबाडीत खाशील…. नीतिधर्मान वागशिला तर चार दिवस सुखाना खाशीला…. आदमापुरात मी सूक्ष्म रूपात हजर हाय… पाप पुण्याचा मी न्याय निवाडा करत बसलोय… तुम्ही माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा…. मामांची हीच शिकवण गेली बारा वर्षे बबन जठार व रामचंद्र भोई युवकांच्या मनावर ठासून बिंबवत आहेत नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी निमित्त त्यांनी युवकांना सोबत घेऊन खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील मामांच्या बग्गा क्रमांक 9 येथे हा उपक्रम राबविला.

कारभारी आप्पासो माळी यांनीही यावेळी येथील युवकांना मामांच्या प्रामाणिक सेवा वृत्ताचा लाभ आपल्याला कोणत्या ना कोणत्याही रूपात मिळत असतो असे न चुकता त्यांनी सांगितले यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचा खडकी ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला पहाटे क्षींच्या अभिषेका नंतर काकड आरती, प्रवचन, भजन कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी पुणे जिल्ह्यातून लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या सेवावृत्तात पत्रकार जोतीराम पोवार, यांच्यासह सागर दाभोळे, बिरदेव सावंत, के डी बरकाळे, प्रेमनाथ बरकाळे, जोतीराम शिंदे, दिलीप पोवार, श्रीकांत कांबळे, बाजीराव कांबळे, रोहित भोई, प्रवीण भोई, भिकाजी कांबळे, बाजीराव भोई, अनिकेत भोई, ओंकार भोई, शंकर गोसावी, दिलीप जाधव, अक्षय भोई यांच्यासह वाघापूर तसेच आदमापुर गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

One Reply to “वाघापूरच्या युवकांनी अखंड जपलीय बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांचे सेवा व्रत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *