कोडोली (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर येथे शुक्रवार दि. १६ जून रोजी संपन्न होत आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व राष्ट्रीय सचीव प्रविण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया वृत्तपत्र क्षेत्रातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर लघु व मध्यम वृत्तपत्रासाठी काम करणारी अग्रगण्य संघटना असून केंद्रशासन मान्यता प्राप्त संघटना आहे. शिवाय केंद्र शासनस्तरावरील आर. एन. आय म्हणजे वृत्तपत्रांची नोंदणी करून त्यावर नियंत्रण ठेवणारी डी. ए. व्ही. पी. म्हणजे जाहिरात व दृश्यमात प्रसिद्धी नियंत्रण करणारी पी. आय. बी. आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या अतिमहत्त्वाच्या स्वायत केंद्रीय संस्थावर प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे.
या बैठकीस प्रस कौन्सिल ऑफ इंडियाची मा. सदस्य तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के. डी. चंडोला, त्याचबरोबर संघटनेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष व प्रेस कौन्सिलऑफ इंडियाचे सदस्य श्यामसिंग पंवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद म्हापत्रा, (ओरिसा) राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी शंकर कटरीया (गुजरात), राष्ट्रीय आर्गोनायझेशन सेक्रेटरी निशा रस्तोगी( उत्तराखंड) यांच्यासह संपूर्ण भारत देशातील संघटनेचे इतर पदाधिकारी व नॅशनल कौन्सिल मेंबर उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकारी N C मेंबर्स त्याच प्रमाणे कोल्हापूर, सांगली,सातारा व सिंधुदुर्ग या जिल्हयातील कांही प्रतिनिधीचा खास निमंत्रित म्हणून समावेश आहे.
ही बैठक कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखान्याच्या शेतकरी भवन मधील तात्यासाहेब कोरे हॉल मध्ये सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. बैठकीमध्ये लघु आणि मध्यम वृत्तपत्रांच्या केंद्र व राज्य शासनाच्या जाहिरात धोरणावर तसेच आएनआय, डिएव्हिपी, पीसीआय,पोष्ट आदि संस्थे कडील विविध समस्या आणि मागण्या यावर विस्ताराने चर्चा होणार आहे अशी माहिती आप्पासाहेब पाटील व प्रविण पाटील यांनी येथे दिली.
पत्रकार परिषदेस संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील, राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष सम्राट सणगर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह पवार ,कोल्हापूर जिल्हा सचिव अरुण वडेकर व राज्य प्रसिद्धी प्रमुख रंगराव शिंपु कडे व सांगली जिल्हाध्यक्ष मारूती नवलाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आभार सम्राट सणगर यांनी मानले