मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल मुरगूड विद्यालयाच्या, (ज्यूनियर कॉलेज ) च्या प्राचार्य पदी एस .पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर उपप्राचार्य पदी एम .डी. खाटांगळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शिक्षण प्रसारक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या नियुक्ती नंतर प्राचार्य एस .पी. पाटील, उपप्राचार्य एम. डी. खाटांगळे यानी संस्थेचे चेअरमन डॉ . मंजिरीताई देसाई-मोरे, व सेक्रेटरी जयकुमार देसाई यांची सदिच्छा भेट घेतली.
सदर नियुक्तीकामी संस्था सचिव जयकुमार देसाई, चेअरमन डॉ. मंजिरीताई देसाई – मोरे, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सांवत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, कोजिमाशीचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक बाळ डेळेकर यांचे तर संस्था सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले. या नियुक्तीबद्दल सर्वस्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .