बातमी

भूमी सुपोषण व संरक्षण जनअभियानाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूकडून कौतुक

नवी दिल्ली : “भूमी सुपोषण व संरक्षण जन अभियानासंदर्भात दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती भवनात कार्यक्रम” दिनांक 2 मे 2002 रोजी माननीय महामहीम उपराष्ट्रपती यांच्या भवनात भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमासाठी देशाचे उपराष्ट्रपती माननीय एम व्यंकय्या नायडू, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, चेअरमन श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी, माननीय नरेंद्र सिंह तोमर, मंत्री, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, माननीय व्ही भाग्याची, वरिष्ठ प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जी आर चिंताला, चेअरमन नाबार्ड व मनोजभाई सोळंकी, अध्यक्ष अक्षय कृषी परिवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना भूमी सुपोषण व संरक्षण अभियान चालवणार्‍या मुख्य संस्थांचे प्रथम अभिनंदन केले व भूमी सुपोषण आणि मानवी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे आपण सर्वांनी आपल्या भूमीचे सुपोषण व संरक्षण करण्याचे अहवान करत ते आपले कर्तव्य आहे असे सांगितले.

परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजीनी भूमी सुपोषण व संरक्षणाचे महत्त्व व आपल्या जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंबंधी संबोधित केले. त्याचसोबत भूमी सुपोषणासाठी देशी गायीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. माननीय नरेंद्र सिंह तोमर, मंत्री, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी देश पातळीवरील प्राकृतिक शेती विषय चाललेल्या कार्याबद्दल संबोधित करत प्राकृतिक शेतीची गरज व प्राकृतिक शेती मालाच्या विक्रीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान भूमी पोषण व संरक्षण अभियानाअंतर्गत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत “भूमी सुपोषण” पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. सदर अभियान 13 एप्रिल 2021 पासून देश पातळीवरती विविध संस्था मार्फत राबविण्यात येत आहे. भूमी सुपोषण व संरक्षण अभियानांतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र मार्फत परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन व शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे कार्य डॉ रवींद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, श्री राजेंद्र वावरे, शास्त्रज्ञ मृदा शास्त्र व श्री सुनील कुमार शास्त्रज्ञ, कृषी विस्तार यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *