कागल : येथील भुयेकर पेट्रोल पंप शेजारी असलेल्या मास्टर शेफ बिर्याणी मझहर पठाण यांच्या बिर्याणी सेंटर जवळील झाडावर राक्षसी आकाराचे दुर्मिळ जातीचे फुलपाखरू दिसले. या फुलपाखराला पाहण्यसाठी लोकांनी गर्दी केली होती.
या फुलपाखराचा आकार तळहाता एवढा आहे. अतिशय सुंदर अशा करड्या रंगाच्या या फुलपाखरांच्या दोन्ही बाजूवरील पंखावर दोन मानवी डोळ्यासारखे पारदर्शक गोल आहेत.
हे फुलपाखरू उत्तर अमेरिकन सॅटर्निडे जातीच्या पतंग कुटुंबातील असून त्याचे शास्त्रीय नाव अँथेरिया पॉलीफेमस किंवा पॉलीफेमस पतंग आहे. सर्वसामान्य फुलपाखरु पेक्षा हे मोठ्या आकाराचे फुलपाखरू असून ज्याचे पंख सरासरी 15 सेमी पर्यंत असतात. पतंगाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मागच्या दोन पंखांवर मानवी डोळ्यासारखे मोठे, जांभळ्या डोळ्यांचे ठिपके असतात. हे खरे डोळे नसले तरी त्याने या फुलपाखराचे भक्षकापासून रक्षण होते. असे दुर्मिळ फुलपाखरू क्वचित दिसते.
1 thought on “राक्षसी आकाराचे दुर्मिळ फुलपाखरू कागल येथे दिसले”