मुरगूड (शशी दरेकर) : संकूचित अभिवृती संकूचित अस्मिताना जन्म देते असे प्रतिपादन येथील मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले.
मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी प्राचार्य डॉ. कुंभार ” व्यक्तिमत्व विकासाचे पैलू ” या विषयावर बोलत होते. महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
प्रा. डॉ. कुंभार म्हणाले. कोरोना मुळे व्यक्तिमत्व विकासाचे अपरिमित नुकसान झाले. जन्मतः आपल्याला व्यक्तित्व मिळालेले असते. व्यक्तिने न्यूनगंड बाजूला सारत स्वतःच स्वतः वर प्रेम केले पाहिजे. माणसांना गरजा कळत नाहीत. त्यांची व्याख्या करता येत नाही. प्राधान्य लावता येत नाही. गरजांचा धिक्कार करू नये. महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी गरजा कोणत्या आहेत हे ओळखून त्यांच्या पूर्ततेसाठी कष्ट घेतले पाहिजेत. पद प्रतिष्ठा पैसा सुख, आनंद, प्रेम, आदी माणसांच्या गरजा आहेत. जीवनातील सर्वोच्च ध्येय यश आणि आनंद असतो असेही ते म्हणाले. व्यक्तिमत्व विकासात दृस्य व्यक्तिमत्व अटीट्यूट टॅलेंट नॉलेज आणि परफॉर्मन्स या पाच बाबीनाही अनन्य साधारण महत्व असल्याचे प्रा. डॉ. कुंभार म्हणाले.
द्वितीय सत्रात मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी. पी. साळुंखे यांचे व्यक्तिमत्व संकल्पना, स्वरूप या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर व्याख्यान झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रत्येकांमध्ये एक चांगला गूण असतो. तो अधिकाधिक विकसीत केला की व्यक्तिमत्व विकास होतो. स्वआदर किती आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे. स्वतःची किमत वाढवायची असेल तर मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आपली अटीट्यूड बदलायला पाहिजे. असेही ते म्हणाले.
यावेळी बिद्रीच्या दूधसाखर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद वारके, प्रा .डॉ. सुशिलेंद्र मांजर्डेकर कागल, प्रा. येझरे, कापशी, मंडलिकमहाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख प्रा. पी. एस. सारंग, ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांच्यासह सर्व प्राध्यापक प्रशासकीय स्टाफ तसेच मोठ्या संखेने विदयार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
सुरुवातीला अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक व कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ शिवाजी होडगे यांनी स्वागत केले व प्रास्ताविक केले त्यांनी कार्यशाळा आयोजित करण्या मागील हेतू विषद केला. प्रा . सुशांत पाटील यानीं सुत्रसंचालन केले . तर प्रा .सुरेश दिवाण यानी आभार मानले,