
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील नेहमी माणसांच्या वर्दळीचा असणारा जवाहर रोड. या रोडवरील रणजित सुर्यवंशी यांची मोटार सायकल नंबर एम एच ०९ सी बी ८३३६ ही मोटार सायकल शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी चोरट्याने चोरून नेली होती.

ही गाडी मुरगूड पोलीसानी अवघ्या दोन दिवसात शोधून काढली. या प्रकरणी संशयित आरोपी अनिल देवाप्पा राठोड सध्या तात्पुरते ठिकाण जनावारांच्या अड्यामध्ये मुरगूड मूळगांव देवनिपुरकी तांडा तालुका सिंधगी, जिल्हा विजापूर याला मुद्देमालासह अटक केली आहे. सपोनि शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय दिनकर माने पुढील तपास करत आहेत.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.