साके धबधबा
बातमी मनोरंजन

पावसाळी पर्यटकांना खुणावतेयं साके चे भैरवनाथ मंदिर


डोंगर कुशीतील निसर्गरम्य ,पश्चिम महाराष्ट्रातील नवसाला पावणारे एकमेव मंदिर


साके (सागर लोहार) : कागल तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत डोंगर कपारीत वसलेलं एक छोटस साके गाव येथील श्री ग्रामदैवत म्हणजे नवनाथापैकी एक नाथ भैरवनाथ नवसाला पावणारे दैवत असल्यामुळे माहेरवाशींनी व कोल्हापूर,सांगली,मिरज पुणे -मुंबई येथील भाविक भक्तगण या भैरोबाच्या पवित्रस्थळी लक्षणी वर्णी लावतातत. पंचक्रोशीतील नवसाला पावणा-या ग्रामस्थांचे श्रध्दांस्थान असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात बारम्हाई पाण्याचे झरे तर पावसाळ्यात डोंगर कपारीतून कोळसणा-या पाऊसधारा,लहानमोठे धबधबे, गावच्या डोंगर कपारीत हिरव्या वनराईने नटलेल्या स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा निर्सगरम्य परिसरात गावापासून एक किलोमिटर अंतरावर श्री भैरवनाथाचे सुंदर मंदिर व मंदिर परिसरातील आंबा ,जांभूळ व करवंदीच्या जाळ्या येथील पुर्वीची परंपरा सांगत आहेत. निसर्गरम्य मंदिर परिसरात हिरवीगार झाडी पाण्याचे धबधवे, ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे निसर्गरम्य अशा पावसाळ्यातील या पर्यटनस्थाळी पर्यटकांची पावसाळी ट्रिप, सेल्फी घेण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे. हे आल्हादायक वातावरण निसर्गरम्य असणारे साके ता.कगल येथील श्री भैरवनाथ मंदिर पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी खुनावत असल्याचे पहायला मिळत आहे.

भैरवनाथ म्हणजे अष्टभैरवपैकी एक अवतार त्यास शंकराचा आवतार असेही मानले जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला अखंडपणे पाण्याचा झरा वाहत आहे. 1972 च्या मोठ्या दुष्काळातही त्याचे पाणी कमी झाले नाही. भैरवनाथाची मुळ गादी करवंदीच्या जाळीत वरती डोंगरावर असून तिला आयलाची जाळी असे नाव आहे. श्री भैरवनाथाच्या डोंगर परिसराला –हाई या नावाने ओळखतात. भैरवनाथाच्या यात्रेला फार प्राचिन काळापासून पंचक्रोशीत पहिला मान आजही आहे. मंदिरा भोवती जुणी वृक्ष असून त्यावरती मधमाशांची शेकडो पोहळ असून ती मंदिर परिसरातील एक वैशिष्ट्य मानले जाते. भेरवनाथाच्या मंदिरासमोर यमाजीबुवा यांची समाधी आहे. देवाच्या पुजा अर्चा करणेचा मान गिरी गोसावी समाजाकडे आजही आबाधीत असून यंदाची पुजा नागेश गिरी यांचेकडे आहे.मंदिराचा जिर्णोधार लोकवर्गणीतून शाहू मंच कला क्रिडा मंडळ, भैरवनाथ देवालय स्थानिक समितीने पंधरा वर्षापुर्वी केला आहे. मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे रूंदीकरणासह डांबरीकरणाचे काम यंदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून पुर्ण झाले आहे. मंदिर परिसराची भक्तांच्या देणगीतून सुशोभिकरण झाले आहे. या मंदिराचा पर्यटनाच्या क वर्गात समावेश व्हावा अशी पंचक्रोशीतील भक्तगण नागरिकातून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *