का ३ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार अभ्यागतांना भेटणार नाहीत

व्यस्त कार्यक्रमांमुळे ३ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत

Advertisements

कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने बरीच जागतिक दर्जाची ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने याठिकाणी उपलब्ध साधनसंपदेची माहिती सर्वदूर पोहोचविण्याच्या दृष्टीने दि. २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने जिल्हा प्रशासन व विविध संस्थांमार्फत दि. २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये व कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार व्यस्त असल्यामुळे 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताहादरम्यान जिल्हाधिकारी श्री. रेखावार अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच तातडीची बाब असल्यास अपर जिल्हाधिकारी अथवा निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Advertisements

5 thoughts on “का ३ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार अभ्यागतांना भेटणार नाहीत”

Leave a Comment

error: Content is protected !!