मुरगुडमध्ये आज शिवरथाचे जल्लोषात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ) : मंगळवार दि.10 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या शताब्दी निमित्त मुरगूड नगरी मध्ये शिव रथाचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत पुष्पवृष्टी करत या रथाचे मुरगुड येथील शिवतीर्थावर स्वागत करण्यात आले.

Advertisements

संयुक्त गाव भाग मुरगुड व मुरगुड विद्यालय जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी , शिवराज विद्यालय मुरगुड विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व संचालक सदस्य व शिक्षक वृंद, उपस्थित होते.

Advertisements

या कार्यक्रमाचे स्वागत उमेश कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक समाधान हेंदळकर यांनी केले. यावेळी पुण्याहून आलेले विजयकुमार पाटील यांनी शिवराज्य रथाची माहिती देऊन तरुणांना शिव भक्तीच्या गर्जना देऊन उत्साही वातावरणात शिवराज्याभिषेक घोषणा देण्यात आल्या.

Advertisements

तसेच शिवराज्य शिवरायांची पार्थना म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पुण्याहून आलेले शांतीबाई पटेल, विजयकुमार पाटील, दीपक दिंडे, हे रथासोबत सहभागी झाले होते. ही रथयात्रा अंबाबाई मंदिरापासून तुकाराम चौक मार्गे शिवतीर्थ येथे आली. कार्यक्रमाचे नियोजन शिवतीर्थ परिवार शिव स्वराज्य प्रतिष्ठान, रन मर्द आखाडा यांनी केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, दत्तात्रय मंडलिक, महादेव वागवेकर, मयूर सावर्डेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन धीरज गोधडे यांनी केले तर आभार सर्जेराव भाट. यांनी मानले.

1 thought on “मुरगुडमध्ये आज शिवरथाचे जल्लोषात स्वागत”

Leave a Comment

error: Content is protected !!