कागल /प्रतिनिधी : चांदीचा कच्चामाल व रुपये बावीस लाख घेऊन व्यापारी तामिळनाडू कडे चालला होता. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली. रुपये रुपये 22 लाख जबरदस्तीने घेऊन लुटमारी केली. सदरचा प्रकार तारीख 13 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल एम आय डि सी त घडला. केवळ 12 तासात लूटमार करणाऱ्यांच्या कागल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींमध्ये सांगली पोलिस मुख्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल चा समावेश आहे. या घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
महेश जगन्नाथ काटकर वय वर्षे 23 राहणार अभयचीवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा, याने पोलिसात गुन्हा नोंद केला मात्र तोच पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. महेश काटकर व सुशील कुमार उर्फ सनी मुरलीधर भांबुरे, राहणार दोघांची (आटपाडी) या दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी शिवानंद बोबडे हा सांगली पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल आहे. तो अद्याप फरारी आहे. महेश काटकर हा चांदी व्यवसायिक आहे.
तो तामिळनाडू सेलम वरून हुपरीत चांदीच्या दागिने देण्यासाठी आला होता. चांदणीच्या दागिने चे रोख रुपये 22 लाख व कच्ची चांदी घेऊन तो परत सेलम कडे जात होता. त्याच्या समवेत त्याच्या गाडीमध्ये तीन चांदी व्यवसायिक होते. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत मार्गे तो हायवे कडे जात होता. रेमंड चौकापासून थोडे अंतरावर गेल्यानंतर, मसोबा मंदिर जवळ आल्यानंतर गाडी आडवी मारून महेशची गाडी थांबवली व आपण पोलिस आहोत असे सांगत गाडीची कागदपत्रे मागणी केली.
यावेळी जबरदस्तीने गाडीतील बावीस लाख रुपये काढून घेतले व महामार्गावरून ते पसार झाले. लुटमारीची फिर्याद नोंदविण्यासाठी महेश काटकर हा रात्री हुपरी पोलीस ठाण्यात गेला. सदरची घटना हुपरीपोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नाही तुम्ही गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे कडे जा. असे हुपरी पोलीस ठाण्यात सांगण्यात आले. तो तेथून गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गेला.
केवळ 12 तासात लूटमार करणाऱ्यांच्या कागल पोलिसांनी मुसक्या आवळल्या
तेथेही सदरची घटना आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगण्यात आले व त्याना कागल पोलीस ठाण्याकडे जाण्याचा सल्ला दिला. पहाटे पाच वाजता या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गाडीतील तिघांचेही मोबाईल तपासण्यास सुरुवात केली. या तिघांपैकी कोणी बाहेर टिप दिली आहे का याचा तपास सुरू केला. यावेळी फिर्यादी विसंगत उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवताच महेश काटकर याने हा प्रकार आपणच केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी बावीस लाखा पैकी २१ लाख रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले तीन लाखाची गाडी असे मिळून चोवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुमार जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, उपनिरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, महादेव बिरांजे आसमा जमादार रणजीत कांबळे, विनायक औताडे, मोहन माटुंगे, प्रभाकर पुजारी, रवी साळुंखे या मोहिमेत सहभागी होते.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे करीत आहेत.
1 thought on “पोलीस असल्याची बतावणी २२ लाखाची लुटमारी”